Tarun Bharat

वीज कडाडत असताना कोणती खबरदारी घ्याल? वाचा महत्त्वपूर्ण माहिती

ऑनलाईन टीम/ तरुण भारत

पावसाळा सुरु झाला की वादळी वारा, विजांच्या कडकडासहित पाऊस पडतो. पावसाच्या सुरुवातीला वीज पडून एकाचा मृत्यू अशा अनेक बातम्या आपण एेकतो. अशावेळी पावसात भिजू नये म्हणून जशी काळजी घेता तशी अंगावर विज पडू नये याचीही काळजी घेणे गरजेचे आहे. स्वत:ला सुरक्षित करण्यासाठी तुम्ही कोणते उपाय करावे याची माहिती आज आपण घेणार आहोत. चला तर जाणून घेऊया या टिप्स..

खरंतर लहानपणापासून आपण आजी-आईकडून एेकत असतो. विजा कडकडत आहेत बाहेर जाऊ नको. पाऊस खूप आहे छत्री घेतली का? असे अनेक प्रश्न त्या विचारत असतात. कधीकधी आपल्याला हे एेकायला नको वाटंत. पण विज आपल्या अंगावर पडू नये म्हणून खबरदारी ही घेतलीच पाहिजे.

विज पडणार हे कसे ओळखावे
आकाशात काळे काळे ढग दाटीवाटीने जमा झाले, की समजावे आता हमखास वीज कडाडणार आहे. अशावेळी तुम्ही घराबाहेर असाल तर घरी लवकर जा. शक्य नसल्यास सुरक्षित ठिकाणाचा आसरा घ्या.

अशी घ्या काळजी

-घरात तुम्ही असाल तर दारे खिडक्यांनपासून दुर रहा. पाण्याशी संबधित कोणतेही काम करु नका.

-इलेक्ट्रिक उपकरणांचा वापर करु नका. घरात असाल तर टी.व्ही, कंम्प्यूटर,फ्रिज बंद करुन, प्लगमधून पिन काढून बाजूला ठेवा.

-हातात छत्री असेल तर बंद करून दूर टाकून द्या, मोकळ्या मैदानांत झाडापासून दूर उभे रहगाव, शेत, आवार, बाग आणि घर यांच्याभोवती तारेचे कुंपण घालू नका, कारण ते विजेला आकर्षित करते.

-शेतात काम करत असाल आणि सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यायला तुमच्याकडे वेळ नसेल तर दोन्‍ही पाय गुडघ्‍याजवळ घेउन खाली बसा आणि कानावर हात ठेवा. तुमचा जमिनीशी कमीतकमी संपर्क येईल, याची खात्री करून घ्या.

-विजा चमकत असतांना तुम्हाला विद्युत प्रभार जाणवल्यास, अंगावरील केस उभे राहिल्यास, त्‍वचेला मुंग्‍या किंवा झिणझिण्‍या आल्यास, तुमच्यावर वीज कोसळण्याची शक्यता असते. अशावेळी त्वरित जमिनीवर आडवे व्हा किंवा गुडघ्यात मान घालून बसा.

धरणं, तलाव अशा पाण्याच्या ठिकाणांपासून लांब राहा.

-मोबाईल जर चार्जिंग लावले असेल तर ते बंद करा. साॅकेटमधून मोबाईल बाजूला करा. याचबरोबर मोबाईल बंद करुन ठेवा.

-एखादी लोखंडाची वस्तू किंवा तांब्याची वस्तू जवळ असेल तर ती तुमच्यापासून दूर फेकून द्या किंवा दूर ठेवून द्या. लोखंडाकडे किंवा तांब्याकडे वीज लगेच अ‍ॅट्रॅक्ट होते.

– पाऊस व वीज होत असताना तुम्ही बाहेर असाल आणि एखादी इमारत जवळ नसेल तर झाडाखाली चुकूनही उभे राहू नका. कारण मोठी झाडे वीजेला खेचत असतात.

वीज पडल्यानंतर काय करायचं?
एखाद्या व्यक्तीवर वीज पडल्यास तुम्ही त्याच्यावर प्रथमोपचार करू शकता. यामुळे तुम्ही त्या व्यक्तीचा जीव वाचवू शकतो. यासाठी तुम्ही बाधित व्यक्तीचा श्वास सुरू आहे का, हृदयाचे ठोके पडताहेत का हे अगोदर तपासा. त्याचा जरश्वासोच्छवास थांबला असेल, तर त्या व्यक्तीच्या तोंडावर तोंड ठेवून कृत्रिम श्वासोच्छवास द्या. तरीही त्याला जाग नाही आली तर जवळच्या दवाखान्यात घेऊन जा.

Related Stories

मुंबई मनपावर शिंदे गट- भाजपाची सत्ताचं असणार- देवेंद्र फडणवीस

Abhijeet Khandekar

सौंदत्ती डोंगरावर महाराष्ट्र ST बसेसची सुरक्षा वाढवली

Archana Banage

शिंदे-फडणवीस दिल्ली दौऱ्यावर;मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होणार?

Abhijeet Khandekar

पंकजा मुंडेसाठी देवेंन्द्र फडणवीसांनी खूप प्रयत्न केले- चंद्रकांत पाटील

Archana Banage

पीएमएलए पाठोपाठ मुंबई हायकोर्टानंही ईडीला सुनावलं

Archana Banage

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राजीनामा देणार का?

Kalyani Amanagi