प्रतिनिधी /बेळगाव
एसकेई संस्थेच्या राणी पार्वतीदेवी कॉलेजमध्ये हिंदीचे महान साहित्यिक मुन्शी प्रेमचंद यांची जयंती साजरी करण्यात आली. स्वागत व प्रास्ताविक हिंदी विभागप्रमुख डॉ. राजेंद्र पोवार यांनी केले. प्रेमचंद यांच्या प्रतिमेचे पूजन प्राचार्या डॉ. अनुजा नाईक यांनी केले.
प्रेमचंद यांच्या जीवनावर आधारित घेतलेल्या निबंध स्पर्धेमध्ये बी. ए. तृतीय वर्षाची विद्यार्थिनी पूजा देमन हिने प्रथम, बी. कॉम. द्वितीय वर्षाची विद्यार्थिनी छाया कर्लेकर हिने द्वितीय व श्रद्धा देमन हिने तृतीय क्रमांक पटकाविला. अपर्णा अकनोजी व रश्मी पुजार यांनी उत्तेजनार्थ क्रमांक मिळविले.
आझादी का अमृतमहोत्सव निबंध स्पर्धेमध्ये हिंदीतून प्रथम क्रमांक वर्षा पालकर, द्वितीय आरती पाटील, तृतीय पूजा देमन, उत्तेजनार्थ अंजली देशपांडे, नताशा मालवणकर यांनी मिळविले. विजेत्यांना प्रमाणपत्र व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. यावेळी कॉमर्स विभाग प्रमुख प्रा. एस. एस. शिंदे, डॉ. चंद्रशेखर मुन्नोळी, डॉ. एस. एच. पाटील, डॉ. अभय पाटील, प्रा. विजयकुमार पाटील यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षिसांचे वितरण करण्यात आले. डॉ. राजेंद्र पोवार यांनी प्रेमचंद यांच्या साहित्याचे महत्त्व विशद केले. निबंधांचे परीक्षण प्रा. एस. एम. कामत व प्रा. रुपा कुलकर्णी यांनी केले. प्रा. विजयकुमार पाटील यांनी आभार मानले.