Tarun Bharat

‘स्टोरीटेलर’ चित्रपटाचा दिव्यांगजन विभागात प्रीमीयर

प्रतिनिधी /पणजी

इफ्फी 53 हा सर्वांसाठी आहे. या वर्षींच्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात विविध दिव्यांग चित्रपट रसिकांनाही चित्रपट उपलब्ध करून देण्याचा आणि सर्वसमावेशकतेच्या भावनेला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. अनंत महादेवन दिग्दर्शित द स्टोरीटेलरचा प्रीमीयर आज महोत्सवाच्या दिव्यांगजन विभागात झाला. स्पेशल स्क्रीनिंग ऑडिओ व्हिज्युअली एम्बेडेड ऑडिओ वर्णन सबटायटल्ससह सुसज्ज करण्यात आला होता. यावेळी एनएफडीसीचे एमडी रवींद्र भाकर, मराठी दिग्दर्शक नागराज मंजुळे, जिओ स्टुडिओचे क्रिएटिव्ह दिग्दर्शक संजय राम, दिव्यांग राज्य आयोगाचे सचिव ताहा हाजिक उपस्थित होते.

नागराज मंजुळे यांनी समाजातील सर्व घटकांना चित्रपट पाहण्याचा आनंद लुटता आला पाहिजे असे मत व्यक्त केले. तर जिओ स्टुडिओचे क्रिएटिव्ह दिग्दर्शक संजय राम यांनी आम्ही सध्याच्या सुलभता मानकांनुसार आणखी चित्रपट तयार करण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन दिले.

Related Stories

मांगोरहिलचा कंटेनमेंट झोन आजपासून अनलॉकच्या दिशेने

Omkar B

पुनम पांडे हिच्याकडून गोव्याच्या बदनामीचा प्रकार

Patil_p

पर्यावरणदिनी आज मिरामार किनारी स्वच्छता मोहीम

Patil_p

गोवा विद्यापीठाच्या पदवी, पदव्युत्तर परीक्षा स्थगीत

Amit Kulkarni

प्रसिद्ध वकील राजीव गोम्स निवर्तले

Omkar B

चोरलेल्या दुचाकीचा तपास लावण्यात वेर्णा पोलिसांना यश

Patil_p