तरुण भारत

अली फझलकडून ‘मिर्झापूर 3’ची तयारी

गुड्डू भैया आ रहे हैं

अली फझलला ‘मिर्झापूर’ सीरिजमध्ये गुड्डू भैयाच्या भूमिकेत प्रेक्षकांनी मोठय़ा प्रमाणात पसंत केले होते. अलीने गुड्डू भैया ही व्यक्तिरेखा स्वतःच्या अभिनयातून जणू जिवंत केली होती. अभिनेत्याने या प्रसिद्ध वेबसीरिजच्या तिसऱया सीझनचे चित्रिकरण सुरू केले आहे. प्राइम व्हिडिओने काही आठवडय़ांपूर्वी ‘मिर्झापूर’च्या नव्या सीझनची घोषणा केली होती.

Advertisements

अली फजलने आता सीरिजमधील स्वतःचा लुक शेअर करत चाहत्यांची उत्सुकता वाढविली आहे. या छायाचित्रात तो हातात बंदूक पकडून असल्याचे दिसून येते. “और समय शुरू होता है! तैयारी, रिहर्सल, रीडिंग. लाठी लक्कड नहीं. अब नीचे से जूते और ऊपर से बंदूकें फायर होंगी. लगाओ हात कमाओ कंटाप! गुड्डू आ रहे हैं…अपने आप’’ असे अलीने कॅप्शनमध्ये नमूद केले आहे. अलीच्या पोस्टवर त्याची प्रेयसी ऋचा चड्ढाने कॉमेंट केली आहे. तर अभिनेत्री श्वेता त्रिपाठी शर्माने ‘प्रतीक्षा आहे’ अशी प्रतिक्रिया दिली आहे.

Related Stories

‘संदीप और पिंकी फरार’चा नवा ट्रेलर

Patil_p

अबोल प्रेमाचा रांगडा बाज ‘जीव माझा गुंतला’

Patil_p

Sushant Singh Rajput Death Anniversary: सुशांतचा आजपर्यंतचा फिल्मी प्रवास फक्त एका क्लिकवर

Abhijeet Shinde

24 जानेवारी रोजी वरुण धवन विवाहाच्या बेडीत

Amit Kulkarni

‘सोनी सब’ वर पुन्हा एकदा ऑफिस ऑफिस

Omkar B

‘एक थी बेगम’ 30 सप्टेंबरला पुन्हा येणार

Patil_p
error: Content is protected !!