Tarun Bharat

पुढील निवडणुकांसाठी भाजपची पूर्वतयारी

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

गुजरातमधील निवडणुका संपण्यापूर्वी भाजपने पुढील निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. दिल्लीतील भाजप मुख्यालयात सोमवारपासून दोन दिवशीय बैठक सुरू झाली असून त्यामध्ये राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमध्ये पुढीलवषी होणाऱया विधानसभा निवडणुकीची रणनीती आखण्यात येणार आहे. सभेला उपस्थित राहण्यासाठी अहमदाबादमध्ये मतदान केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीतील भाजप कार्यालयात पोहोचले होते. तसेच पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह अन्य ज्येष्ठ नेतेही या बैठकीत पदाधिकाऱयांना मार्गदर्शन करणार आहेत.

पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीत भाजप पदाधिकाऱयांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. सोमवारी पंतप्रधान मोदींच्या भाषणाने सभेची सुरुवात झाली. मात्र, या बैठकीतील सविस्तर चर्चा उघड करण्यात आलेली नाही. या बैठकीत विधानसभा निवडणुकीसोबतच आगामी लोकसभा निवडणुकीच्या रणनीतीवरही चर्चा होणार आहे. या बैठकीत सर्व राज्यांचे प्रभारी, सहप्रभारी, आघाडय़ांचे प्रभारी आणि संघटन मंत्री सहभागी झाले आहेत.

2018 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमधून भाजप सरकारचा पराभव झाला होता. तिन्ही राज्यात काँग्रेसचे सरकार स्थापन झाले. राजस्थानमध्ये अशोक गेहलोत, छत्तीसगडमध्ये भूपेश बघेल आणि मध्यप्रदेशमध्ये कमलनाथ मुख्यमंत्री झाले. मात्र, मध्यप्रदेशात 15 महिने सरकार राहिल्यानंतर कमलनाथ यांना आपले सिंहासन गमवावे लागले. ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या नेतृत्वाखाली बऱयाच आमदारांनी पक्ष सोडल्यामुळे सरकार अल्पमतात आले. त्यानंतर पुन्हा एकदा शिवराजसिंह चौहान यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे सरकार स्थापन झाले होते. गेल्या चार-पाच वर्षांत येथे भाजपने पुन्हा एकदा भक्कम पायाभरणी केल्याचे दिसून येत आहे.

Related Stories

चंदीगड विमानतळाला ‘भगतसिंग’ यांचे नाव

Patil_p

मतदान यंत्रे तृणमूल नेत्याच्या घरात

Patil_p

रॉचा आयएसआयला संदेश अन् अभिनंदन यांची मुक्तता

Amit Kulkarni

वृंदावनमध्ये दोघांचा चेंगराचेंगरीत मृत्यू

Patil_p

न्यायाधीशांचे निवृत्ती वय वाढविण्याचा प्रस्ताव

Amit Kulkarni

इटलीहून आलेल्या विमानातील 179 पैकी 125 पॉझिटिव्ह

Amit Kulkarni