Tarun Bharat

पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी चोख व्यवस्थेची तयारी

प्रतिनिधी / पणजी

 रविवार दि. 11 डिसेबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी गोव्यात येत असल्याने पोलीस खात्याकडून सुरक्षेची जय्यत तयारी सुरू झाली आहे. पंतप्रधान मोप आणि पणजी या दोन ठिकाणी येणार असल्याने संपूर्ण उत्तर गोव्यात सुरक्षेची तयारी सुरू आहे.

पेडणे व बार्देश तालुक्यात पोलिसांनी कडक तपासणी सुरू केली आहे. भाड्याने राहत असलेल्या लोकांची तपासणी सुरू असून बेकायदेशीर भाड्याने राहिलेल्या लोकांवर कारवाई केली जात आहे. पेडणे पोलिसांच्या गाड्या दिवसरात्र ठिकठिकाणी फेऱ्या मारीत असून संशयास्पदरित्या आढळलेल्या व्यक्तीला पोलीस स्थानकात नेऊन त्याची सखोल चौकशी करण्यात येत आहे.

मोप विमानतळ आणि परिसरात कडक तपासणी केली जात असून सीएसएफ पोलीस तैनात करण्यात आले आहेत. गोवा पोलीस खात्यातील सुरक्षा विभागाचे 400 हून अधिक पोलीस पंतप्रधान सुरक्षा व्यवस्थेच्या तयारीत गुंतलेले आहेत. तर उत्तर गोवा जिल्हा पोलीस विभागाचे एक हजारहून अधिक पोलीस सुरक्षा व्यवस्थेची तयारी करत आहेत.

Related Stories

पाब्लो एस्कोबारची मुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी

Amit Kulkarni

गॅरेंजमालकही खाणी सुरू होण्याच्या प्रतिक्षेत

Patil_p

अवेडे शांतादुर्गा चामुंडेश्वरी संस्थानचा जत्रोत्सव आजपासून

Amit Kulkarni

आयटी अभियंता उतरला खोबरे व्यवसायात

Omkar B

सत्ता असो वा नसो आपल्याला काही फरक पडत नाहीय ः कामत

Patil_p

मनपासह सात पालिकांसाठी 204 अर्ज

Amit Kulkarni