Tarun Bharat

विधानसभा निवडणुकांसाठी भाजपकडून तयारी

प्रत्येक राज्यात मोदीच असणार भाजपचा मुख्य चेहरा

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

आगामी विधानसभा निवडणुकांसाठी भाजपने कंबर कसली आहे. 2023 पर्यंत होणाऱया सर्व विधानसभा निवडणुका सामूहिक नेतृत्वाखाली लढविण्यात येणार आहेत. रणनीतिनुसार कुठल्याही राज्यात मुख्यमंत्री पदाच्या उमेदवाराचे नाव जाहीर केले जाणार नाही. परंतु विद्यमान मुख्यमंत्र्यांना निवडणूक जिंकल्यावर मुख्यमंत्री म्हणून कायम राहण्याची संधी मिळू शकते. चालू वर्षाच्या अखेरीस गुजरात आणि हिमाचल प्रदेशात निवडणूक होणार आहे. तर पुढील वर्षी कर्नाटक, त्रिपुरा, मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे.

हिमाचल, गुजरात, त्रिपुरा, मध्यप्रदेश अन् कर्नाटकात भाजपचे सरकार आहे. सत्तारुढ राज्यांच्या नेतृत्वावरून सत्ताविरोधी कल असल्याचे मत संसदीय मंडळाच्या पुनर्रचनेनंतर वरिष्ठ नेत्यांदरम्यान व्यक्त झाले आहे. संघटनस्तरावर परस्पर ताळमेळ नसल्याचेही बोलले गेले. अशा स्थितीत वर्तमान मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता कमीच आहे.

विधानसभा निवडणुकांमध्ये केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदींचा चेहरा पुढे केला जावा असे या सर्व मुख्यमंत्र्यांचे मत आहे. केंद्र सरकारच्या योजनांवर राज्य सरकारांकडून योग्यप्रकारे अंमलबजावणी करत वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न असणार आहे.  मोदींच्या नेतृत्वात डबल इंजिन सरकार सर्वोत्तम पर्याय असल्याचा संदेश भाजपकडून दिला जाणार आहे.

सामूहिक नेतृत्वाचा अर्थ सत्तेवर आल्यावर मुख्यमंत्री बदलला जाणार असा नसल्याचे पक्षाचे एका महासचिवाने सांगितले आहे. याकरता या नेत्याने गोवा तसेच उत्तराखंडचे उदाहरण दिले आहे. ज्या राज्यांमध्ये भाजप विरोधी पक्ष तेथे मोदींचा चेहरा समोर करत सामूहिक नेतृत्वात निवडणूक लढविण्यात येणार आहे. पक्षाच्या अंतर्गत सर्वेक्षणात कुठल्याही वर्तमान मुख्यमंत्र्याची लोकप्रियता 25 टक्क्यांपेक्षा अधिक आढळून आलेली नाही. तर पंतप्रधान मोदींची लोकप्रियता मात्र 75 टक्क्यांहून अधिक आहे. अशा स्थितीत भाजप कुठल्याही स्थितीत मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करून जोखीम पत्करू इच्छित नाही.

Related Stories

मोठी कारवाई : आसाममध्ये तब्बल 100 कोटींचे अमली पदार्थ जप्त

Abhijeet Khandekar

आरजेडीचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांना जामीन मंजूर; पण…

Tousif Mujawar

औषधांच्या काळाबाजारावर राज्यांनी कठोर कारवाई करावी

Patil_p

पुढील निवडणुकांसाठी भाजपची पूर्वतयारी

Patil_p

भारतात एकूण लसीकरणाने केला 94 लाखाचा टप्पा पार

Tousif Mujawar

पंजामधील कोरोना : मागील 24 तासात 1,407 नवे रुग्ण; 66 मृत्यू

Tousif Mujawar