आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघातर्फे (इस्कॉन) आयोजित केलेली 25 वी हरेकृष्ण रथयात्रेला आज शनिवार दिनांक २८ रोजी दुपारी १ वाजता धर्मवीर संभाजी चौकातून या रथयात्रेस प्रारंभ होईल.
सुरुवातीला इस्कॉनच्या ज्येष्ठ संन्याशांच्या उपस्थितीत रथयात्रेस हिरवा बावटा दाखवल्यानंतर उपस्थित भाविकांकडून रथ ओढला जाईल.
भव्य रथामध्ये राधाकृष्ण आणि गीताई गौर भगवान यांच्या मूर्ती रथयात्रेच्या मार्गावर दाखल झाले असून श्रीकृष्ण भक्तगणांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.