Tarun Bharat

स्वातंत्र्यदिनाच्या तयारीला गती

Advertisements

विद्युत रोषणाईसह सजावटीचे काम पूर्ण करण्याची सरकारी कार्यालयांची धडपड : सोशल मीडियावरही एकच आवाज

प्रतिनिधी /बेळगाव

अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त प्रत्येक घरावर आणि सरकारी कार्यालयांवर दि. 13 ते 15 ऑगस्टपर्यंत तिरंगा ध्वज फडकविण्याचे आवाहन केंद्र सरकारने केले आहे. त्यानुसार आता सरकारी कार्यालयांमध्ये हे ध्वज फडकविण्यासाठी शुक्रवारी मोठी धावपळ सुरू होती. प्रत्येक कार्यालयावर विद्युत रोषणाई आणि सजावटीचे काम सुरू होते. कार्यालयातील स्वच्छता आणि इतर गोष्टींकडे लक्ष देण्यात येत आहे. त्यामुळे कर्मचाऱयांची धावपळ उडत आहे.

स्वातंत्र्य दिन जवळ आला की देशभक्ती उफाळून येते आणि त्या भक्तीची माहिती पसरविणारे, नागरिक म्हणून जगण्याची दिशा दाखविणारे संदेश फिरू लागतात. आता एसएमएसचा जमाना संपला आणि सारे काही सोशल मीडियावर व्हायरल करण्याचा नवा ट्रेंड सुरू झाला आहे. या ट्रेंडमध्ये तरुणाई स्वातंत्र्यदिनाच्यानिमित्ताने जागृतीपर व्हिडिओ तयार करून त्यांचा प्रसार करत आहे. 

स्वातंत्र्य दिनाच्यानिमित्ताने नशामुक्तीचा संदेश देतानाच बेळगाव शहरातील ऐतिहासिक स्थळांची एकत्रित व्हिडिओ क्लिप तयार केली आहे. त्यामुळे सध्या 15 ऑगस्टचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर पहायला मिळत आहेत. सध्या सरकारी कार्यालये आणि प्रत्येक घरावर तिरंगा या मोहिमेमुळे नवचैतन्य दिसून येत आहे. सलग तीन दिवस घरांवर भगवा फडकविण्याची ही पहिलीच वेळ असल्याने सर्वच देशप्रेमी अतूर झाले आहेत. देशप्रेम दाखविण्यासाठी अनेक जणांनी वेगवेगळय़ा क्लृप्त्या लढविल्या आहेत. त्यामुळे शुक्रवारी अनेक कार्यालयातील कर्मचाऱयांनी 15 ऑगस्टची तयारी चार दिवसांपूर्वीपासूनच सुरू केल्याचे चित्र दिसून येत आहे. 

Related Stories

वादळी पावसाने हजारो वृक्ष जमीनदोस्त

Amit Kulkarni

नियमांचे पालन करत महामाया देवीची यात्रा साजरी करा

Patil_p

कोविड केअर सेंटरनाही रेमडेसिवीरचा पुरवठा करा

Amit Kulkarni

प्रभारी मनपा आयुक्तपदी प्रवीण बागेवाडी रुजू

Amit Kulkarni

तीन वर्षांनंतरही त्या 11 जणांचा शोध नाही

Rohan_P

बेळगाव स्पोर्ट्स क्लब अ, अमृत पोतदार सीसीआय संघांचे विजय

Amit Kulkarni
error: Content is protected !!