Tarun Bharat

महाआरोग्य शिबिराची तयारी पूर्ण

आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्या हस्ते रविवारी उद्घाटन

उस्मानाबाद/प्रतिनिधी

परंडा येथील कोटला मैदानावर आयोजित दोन दिवसीय महाआरोग्य शिबिराची तयारी पूर्ण झाली आहे. विविध आजारांची तपासणी व उपचार विभागात जवळपास पाच लाख रूग्णांवर होेणार आहेत. त्याअनुषंगाने लागणारे सर्व वैद्यकीय साहित्य, औषधे व सोयी-सुविधा उभारण्यात आली आहे. रविवारी आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्या हस्ते व राज्यातील प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत शिबिराचे उद्घाटन होणार आहे.

आरोग्य विभाग आणि आर. के. एचआयव्ही एड्स रिसर्च अ‍ॅन्ड केअरिंग सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने परंडा येथील कोटला मैदानावर महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात भूम, वाशी, परंडा, सोलापूर, माढा, करमाळा, लातूर, बीडसह परिसरातील नागरिक सहभागी होणार आहेत. या शिबिरासाठी अठराशे डॉक्टर व इतर कर्मचारी रूग्णांची नोंदणी, तपासणी व आवश्यक ते उपचार करणार आहेत. यासाठी कोटला मैदानावर मंडप, व्यासपीठ, विविध तपासणी कक्ष, भोजन व्यवस्था, निवास व्यवस्था, नोंदणी कक्ष, वाहनतळ, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छतागृहे उभारण्यात आली आहेत. शिबिरस्थळी रूग्णांना घरापासून आणण्यासाठी मोफत वाहन व्यवस्था करण्यात आली आहे. नागरिकांच्या अल्पोपहार व भोजनाचीही व्यवस्था शिबिराच्या ठिकाणी करण्यात आली आहे. त्यामुळे या शिबिराला अपेक्षेपेक्षा अधिक प्रतिसाद मिळेल, अशी आशा संयोजकांनी व्यक्त केली .

Related Stories

सोलापूर : वाळू तस्करांची शेतकऱ्यास मारहाण

Archana Banage

शिवसेना जिल्हाप्रमुखाने भाजपा जिल्हाध्यक्षाला भरला दम

Archana Banage

वैरागमध्ये कोरोना विळख्यातच प्रशासनाचा सावळा गोंधळ

Archana Banage

सोलापूर : शिराळ येथे एकाचा खून, मृतदेह जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न

Archana Banage

एस.टी. कर्मचा-यांचे वेतन उद्या जमा होणार

Archana Banage

सोलापूर शहरामध्ये ५४ तर ग्रामीणमध्ये २१४ रुग्ण

Archana Banage