Tarun Bharat

महाराष्ट्राच्या मंत्र्यांना सीमेवरच अडविण्याची तयारी

कोगनोळीसह सीमाभागात 14 ठिकाणी तपास नाके

प्रतिनिधी /बेळगाव

सीमासमन्वय मंत्री चंद्रकांत पाटील व शंभूराज देसाई यांचा बेळगाव दौरा जाहीर झाल्यानंतर पोलिसांनी कोगनोळी नाक्मयावर कुमक वाढविली आहे. महाराष्ट्रीय मंत्र्यांना बेळगावात प्रवेश देऊ नये, यासाठी प्रशासनाने तयारी केली असून निपाणी परिसरात 14 चेकपोस्ट उभारण्यात आले आहेत.

जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. संजीव पाटील यांनी गुरुवारी निपाणीला भेट देऊन तेथील व्यवस्थेची पाहणी केली. पोलिसांनी जय्यत तयारी केली असली तरी महाराष्ट्रीय मंत्र्यांचा दौरा तीन दिवस पुढे ढकलण्यात आला आहे. आता ते तीन ऐवजी 6 डिसेंबर रोजी बेळगाव दौऱयावर येणार आहेत, अशी माहिती मिळाली आहे.

कोगनोळी नाक्मयावर राज्य राखीव दलाच्या 10, जिल्हा सशस्त्र दलाच्या 10 तुकडय़ा तैनात करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. याबरोबरच 500 पोलीस बंदोबस्तासाठी ठेवण्याची तयारी करण्यात आली होती. महाराष्ट्रीय मंत्र्यांच्या बेळगाव दौऱयाला कन्नड संघटनांनी विरोध केल्यामुळे त्यांना सीमेवरच अडविण्यासाठी कर्नाटकीय पोलिसांनी ताकद लावली आहे.

शनिवारी दोन्ही मंत्र्यांना अडविण्याचे पोलिसांनी ठरविले होते. आता त्यांच्या दौऱयाची तारीख बदलली आहे. महापरिनिर्वाण दिनाच्या पार्श्वभूमीवर बेळगावला येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. कन्नड संघटनांच्या दबावामुळे सीमासमन्वय मंत्र्यांना सीमेवरच अडविण्याची तयारी पोलीस दलाने केली आहे.

Related Stories

मृतावस्थेत आढळलेल्या जनावरांचा केला अंत्यसंस्कार

Patil_p

भर पावसातही म.ए.समितीचा झंझावाती प्रचार

Amit Kulkarni

आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्यातर्फे दोन रुग्णवाहिका

Omkar B

तालुक्यात नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन उत्साहात

Amit Kulkarni

मेरडा गावच्या महाबळेश्वर पाटील यांना वाढता पाठिंबा

Patil_p

निपाणीत जनता कर्फ्यूला संमिश्र प्रतिसाद

Patil_p