48 तासांमध्ये भारत सोडणार शेख हसीना : फिनलंड अन् रशियाचा पर्याय
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना अद्याप हिंडन वायुतळावरील सेफ हाउसमध्ये आहेत, पुढील रणनीतिवरून भारत सरकारसोबत त्यांचे मंथन सुरू आहे. शेख हसीना पुढील 48 तासांमध्ये भारतातून बाहेर पडणार असल्याचे सांगण्यात येत आहे. हसीना या युरोपमधील एखाद्या देशात जाऊ शकतात. रशियात आश्रय घेण्याचा पर्याय देखील त्यांच्यासमोर आहे.
शेख हसीना यांची अन्य देशांसोबत देखील चर्चा सुरू आहे. शेख हसीना यांना भारत पूर्ण सुरक्षा पुरविणार आहे तसेच त्यांच्या अन्य देशाच्या प्रवासाचीही व्यवस्था करणार आहे. हसीना यांच्याकडून फिनलंड किंवा रशियाचा पर्याय निवडला जाणार असल्याचे मानले जात आहे. हसीना यांच्या कुटुंबाचे काही सदस्य फिनलंडमध्ये असल्याने त्यांनी उत्तर युरोपीय देशासाठी रवाना होण्याचा विचार चालविला आहे.