Tarun Bharat

डिचोली तालुक्मयात दमदार पावसाची हजेरी

Advertisements

शुक्रवारी सायंकाळापासून जोर वाढला : सर्वत्र पावसाळी वातावरणामुळे हवेत गारवा

प्रतिनिधी /डिचोली

राज्यात मोसमी पावसाला प्रारंभ झाल्याने, सर्वत्र हवेत गारवा निर्माण झाला आहे. डिचोली तालुक्मयात काल शुक्र. दि. 10 रोजी पावसाने दमदार हजेरी लावल्याने सर्वत्र पावसाळी वातावरण निर्माण झाले. सकाळच्यावेळी अधूनमधून पडणाऱया पावसाने संध्याकाळी 4 वाजल्यानंतर जोर धरला. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत अविश्रांत पावसाची रिपरिप चालूच होती. या पावसामुळे शेतकरी वर्ग मात्र सुखावला आहे. शेतांच्या कामांना आता वेग येणार आहे.

राज्यात यावेळी मान्सून लवकर असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र अधूनमधून तुरळक पडणारा पाऊस नेहमी हुलकावणी देत होता. त्यामुळे उकाडय़ात मात्र बरीच वाढ झाली होती. या उकाडय़ातून दिलासा मिळावा यासाठी लवकर पाऊस सुरू व्हावा, अशीच लोकांची अपेक्षा होती. ही अपेक्षा पूर्ण होण्यासाठी जुनची 10 तारीख उजाडावी लागली.

गेले आठ दिवस वातावरण करून किंवा न करताच पडणारा पाऊस हा लोकांना हुलकावणी देत होता. दुचाकी चालकांची त्यामुळे बरीच धांदल उतड होती. रस्त्यावर गाडी चालवत असताना मध्येच जोरदार येणाऱया पावसामुळे दुचाकी कोणत्याही झाडाच्या खाली रोखून रेनकोट परिधान करावा लागत होता. काही वेळाने उन लागल्यानंतर तो काढावा लागे.   काल शुक्रवारी मात्र सकाळच्या सत्रात काही प्रमाणात हुलकावणी दिलेल्या पावसाने संध्याकाळी जोर धरला. संध्याकाळी 3.30 वा. च्या सुमारास काहीसा वीजेचा लखलखाट आणि गडगडाटासह पावसाला सुरूवात झाली. या पावसाने नंतर जोर धरला. रात्री उशिरापर्यंत संततधार सुरूच होती. त्यामुळे वातावरणात थंडावा निर्माण झाला होता. पावसाचे दिवस असल्याची जाणीव असल्याने लोकांची तारांबळ उडाली नाही. लोक रेनकोट, छत्र्या बरोबर घेऊनच घरातून बाहेर पडले होते. जोरदार पावसामुळे लोकांवर अडकून राहण्याची परिस्थिती ओढवली नाही.

Related Stories

मडगाव आरोग्य केंद्रावर लसीकरणासाठी गर्दी

Patil_p

नियमांचे उल्लंघन; खडीवाहू ट्रक दिला पोलिसांच्या ताब्यात

Amit Kulkarni

अग्निशामक दलाचे कार्य उल्लेखनीय

Omkar B

म्हापशात नगरसेवक आरोलकर बंधूचा काँग्रेसमध्ये प्रवेश

Amit Kulkarni

पावसाने गोव्याला झोडपले

Amit Kulkarni

माजी जिल्हा पंचायत सदस्य तथा पंच प्रदिप पटेकर यांचा मगो पक्षात कार्यकर्त्यासाहित प्रवेश

Amit Kulkarni
error: Content is protected !!