तरुण भारत

नेक्सन ईव्ही मॅक्सचे सादरीकरण

एका चार्जिंगवर 437 किलोमीटर धावणार असल्याचा कंपनीचा दावा

वृत्तसंस्था /नवी दिल्ली

Advertisements

टाटा मोर्ट्सकडून नेक्सन ईव्ही मॅक्स या नव्या  इलेक्ट्रिक कारचे सादरीकरण करण्यात आले आहे. सदरची गाडी ही एका चार्जिंगवर 437 किलोमीटर पर्यंत धावणार असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

इलेविट्रक कारच्या गटात टाटाच्या गाडीची सुरुवातीची एक्सशोरुम किमत 17.74 लाख रुपये राहणार असल्याची माहिती आहे. नेक्सन ईव्ही मॅक्समध्ये फास्ट चार्जिंग सुविधाही मिळणार आहे. यामध्ये 7.2 केडब्ल्यू एसी फास्ट चार्जरसह 6.5 तासामध्ये गाडी पूर्ण चार्जिंग करता येणार आहे. ज्यामध्ये व्यावसायिक वापर करणाऱयांसाठी 50केडब्ल्यू डीसी चार्जरमधून 56 मिनिटात 80 टक्के चार्जिंग होणार आहे. नेक्सन ईव्ही मॅक्समध्ये 40.5केडब्ल्यूएच पॉवरफूल लिथियम आर्यन बॅटरी दिली आहे. तासाला 140 किमीचा वेग ही गाडी घेईल.

अन्य बाबी…

  • सदरची गाडी 143 पीएसची मॅक्स पॉवर जनरेट करणारी आहे.
  • ही कार 0 ते 100 किमी वेगाने 9 सेकंदात वेग पकडणार असल्याचा दावा, तर टॉप स्पीड 140 किमी प्रति तास राहणार असल्याचेही म्हटले आहे.
  • सुरुवातीची एक्स शोरुम किमत ही 17.74 लाखापासून सुरु होणार असून 19.24 लाख रुपयांपर्यंत राहणार आहे
  • अत्याधुनिक फिचर्सच्या सुविधा मिळणार

Related Stories

बीएमडब्ल्यूचा 1 लाखाचा टप्पा पार

Patil_p

आगामी वर्षात विक्रीत सुधारणा : ऑडी

Patil_p

‘किया’कडून ग्राहकांसाठी ऑनलाईन पर्याय उपलब्ध

Amit Kulkarni

ट्रीम्पची नवी बाईक बाजारात दाखल

Amit Kulkarni

स्कोडाच्या रॅपिड एटी कारचे बुकिंग सुरू

Patil_p

होंडा सिटी इलेक्ट्रिकचे उत्पादन सुरु

Patil_p
error: Content is protected !!