ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ यांच्या अंत्यसंस्काराला हजेरी लावणार
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू दोन दिवसीय ब्रिटन दौऱयावर रवाना झाल्या आहेत. या दौऱयात त्या ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहणार आहेत. महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्यावर सोमवारी 19 सप्टेंबर रोजी अंत्यसंस्कार पार पडणार आहेत. महाराणीचे पार्थिव सध्या अंतिम दर्शनासाठी बकिंगहॅम पॅलेसमध्ये ठेवण्यात आले आहे. सोमवारी पार्थिव लंडनमधील विंडसर येथील किंग जॉर्ज चतुर्थ मेमोरियल चॅपलमध्ये दफन करण्यात येईल. महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या शासकीय अंत्यसंस्कारात सहभागी होण्यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 17 ते 19 सप्टेंबर 2022 रोजी लंडनमध्ये असतील. महाराणी एलिझाबेथ यांच्या निधनानंतर राष्ट्रपतींबरोबरच उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेकांनी शोक व्यक्त केला आहे. भारतात एक दिवस दुखवटाही पाळण्यात आला होता.