प्रतिनिधी / पणजी
एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू या 14 जुलै रोजी गोव्यात येत असून त्या सर्व आमदारांना भेटणार आहेत. आपला प्रचार त्या करणार असून मतांसाठी आमदारांना विनंती करणार आहेत. सत्ताधारी भाजप व विरोधी पक्षीय आमदारांशी त्या चर्चा करतील आणि आपली भूमिका मांडतील. गोव्यातील सर्व आमदारांची मते मुर्मू यांना महत्त्वाची असून ती मिळविण्यासाठी त्या गोव्यात येऊन त्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगण्यात आले.