Tarun Bharat

राष्ट्रपतींचा आजपासून कर्नाटक, गोवा दौरा

राजभवनची कोनशिला 15 रोजी

प्रतिनिधी /पणजी

राष्ट्रपती रामनाथ कोविंद आजपासून कर्नाटक आणि गोवा राज्यांच्या दौऱयावर येणार आहेत. दि. 13 ते 15 जून या तीन दिवसात दोन्ही राज्यात त्यांच्याहस्ते अनेक प्रकल्पांचे लोकार्पण होईल, तसेच कोनशिला बसविण्यात येणार आहेत. बेंगळुरू येथे होणाऱया एका सोहळ्यातही राष्ट्रपती उपस्थिती लावणार आहेत.

बेंगळुरू येथील राष्ट्रीय लष्करी प्रशिक्षण संस्थेचा अमृत महोत्सवी कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून आज दि. 13 जून रोजी होणाऱया या समारंभात राष्ट्रपती प्रमुख अतिथी म्हणून सहभागी होणार आहेत.

उद्या दि. 14 जून रोजीही राष्ट्रपतींचा दौरा बेंगळुरूलाच असेल. त्या दिवशी ते वसंतपुरा भागातील वैकुंठ हिल परिसरात श्री राजाधिराजा गोविंद मंदिराचे लोकार्पण करणार आहेत.

दि. 15 जून रोजी राष्ट्रपती गोव्यात पोहोणार आहेत. यापूर्वी दि. 31 मे रोजी गोवा घटकराज्यदिनी राष्ट्रपती गोव्यात येणार होते. परंतु ऐनवेळी त्यांचा दौरा स्थगित झाला होता. या दौऱयात ते दोनापावला येथे नवीन राजभवन प्रकल्पाची कोनाशिला बसविणार होते. सदर समारंभ आता दि. 15 रोजी होणार आहे. या कोनशिला समारंभानंतर राष्ट्रपती दिल्लीला प्रस्थान करतील.

Related Stories

आर.के. श्रीवास्तव यांना दोन वर्षांसाठी तुरुंगाची हवा

Patil_p

फोंडयात सिनेमागृह बंदावस्थेत, सिनेरसिक हिरमुसले

Omkar B

कदंब महामंडळातील प्रलंबित बढत्यांची प्रक्रिया पूर्ण

Amit Kulkarni

कर्नाटक लॉकडाऊन : ४ लाख नागरिकांनी बेंगळूर सोडले

Archana Banage

गोमंतक मराठा समाजाला निवडणुकपूर्वी ओबीसीचा दर्जा देण्यात यावा

Amit Kulkarni

चोवीस तासात कोरोनाचे 2 बळी

Amit Kulkarni