नवी दिल्ली :
ऑटो मोबाईल क्षेत्रातील दिग्गज कंपनी टाटा मोटर्स लवकरच आपल्या काही वाहनांच्या किंमती वाढविणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार टाटा मोटर्स आपल्या व्यावसायिक वाहनांच्या किंमती वाढविणार आहे. सदरची वाढही 2 टक्क्यापर्यंत केली जाणार असल्याचे सांगितले जात असून सदरची वाढ 1 जुलैपासून अंमलात येण्याची शक्यता आहे. व्यावसायिक वाहनांमध्ये सर्व प्रकारच्या वाहनांच्या किंमती वाढलेल्या असतील. ट्रक, बससह इतर व्यावसायिक वाहनांच्या किंमती वाढविल्या जाणार आहेत. यापूर्वी 1 एप्रिल रोजी याचवर्षी टाटा मोटर्सने किंमतीत 2 टक्के वाढ केली होती. सलग तिसऱ्यांदा वाहनांच्या किंमती वाढविल्या जाणार आहेत. 1 जानेवारी 2024 रोजी सुद्धा कंपनीने किंमती वाढविल्या होत्या.