Tarun Bharat

क्रिजवाईजतर्फे कर्मचाऱयांच्या मुलांचा गौरव

प्रतिनिधी /बेळगाव

आपल्या दुकानातील कामगारांच्या मुलांना त्यांच्या शिक्षणासाठी आर्थिक साहाय्य करण्याचा स्तुत्य उपक्रम येथील क्रिजवाईज टेलर्सच्यावतीने राबविण्यात येत आहे. या अंतर्गत दहावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या कामगारांच्या पाच मुलांना रोख रक्कमेचे पुरस्कार व मिठाई देऊन सोमवारी गौरविण्यात आले.

सामाजिक कार्यकर्ते आणि क्रिजवाईजचे संचालक कृष्ण भट्ट यांनी प्रतीक्षा हेगडे, (महिला विद्यालय, 98 टक्के), पायल वासुदेव (कर्मवीर विद्या मंदिर, 92 टक्के), सायली पोटे (भरतेश स्कूल, 65 टक्के), हरिश आर. आय. (बेननस्मिथ स्कूल,  60 टक्के) व साक्षी जाधव (60 टक्के) असे गुण मिळविलेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी रोख रक्कम प्रदान केली. उच्चशिक्षण घेणाऱया कामगारांच्या मुलांना आर्थिक सहकार्य करण्याचे जाहीर केले.

यावेळी कृष्णा भट्ट, पंकजा भट्ट, विनायक भट, दीपा भट्ट व अनंत लाड व इतर कामगार यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पुरस्कार, भेटवस्तू व गुलाबपुष्प देऊन गौरविण्यात आले. प्रारंभी वाणी रमेश यांनी स्वागत गीत सादर केले. याप्रसंगी क्रिजवाईज समूहातील सर्व कर्मचारी उपस्थित होते.

Related Stories

सुरतला 21 पासून विमानसेवा होणार सुरू

Patil_p

हेब्बाळकर यांच्या प्रचारासाठी शिवराजकुमार आज बेळगावात

Amit Kulkarni

वजनमाप खात्याच्या अधिकाऱ्याच्या घरावर एसीबीची धाड

Tousif Mujawar

बीसीसी मच्छे, विश्रुत स्ट्रायकर संघ विजयी

Amit Kulkarni

संत मीरा संघाला सर्वसाधारण विजेतेपद

Amit Kulkarni

धुलिवंदनानिमित्त सावगावात शुक्रवारी भव्य कुस्ती मैदान

Amit Kulkarni
error: Content is protected !!