वार्ताहर /धारगळ
गोमंतक धनगर समजोन्नती मंडळ बार्देश तालुका समितीच्या वतीने गोवा बोर्डाच्या दहावी व बारावी शैक्षणिक वर्ष 2021-22 च्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन चांगल्या गुणांसह यश संपादित केलेल्या बार्देश तालुक्मयातील धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांचे त्यांच्या घरी जाऊन अभिनंदन केले. या विद्यार्थ्यांमध्ये दहावीच्या परीक्षेत ऋणाली लक्ष्मण शेळके 86 टक्के, सानिया मालो गवळी 77 टक्के, शैलेश शाम खरवत 72 टक्के यांचा समावेश आहे.
बारावीच्या परीक्षेमध्ये सुलक्षा शाम खरवत 79 टक्के-विज्ञान शाखा, धाकेश लक्ष्मण शेळके 75 टक्के-कला, आकांक्षा रमेश ताटे 67 टक्के-कला व वैष्णवी पद्मनाभ वरक 61 टक्के-कला या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या अभिनंदन कार्यक्रमावेळी समितीच्या वतीने अध्यक्ष विनायक खरवत, सरचिटणीस मदू वरक, कोषाध्यक्ष साईनाथ वरक, उपाध्यक्ष पांडुरंग पाटील, सभासद नानू खरवत, शाहू शेळके, सल्लागार रघु वरक इत्यादी उपस्थित होते.