Tarun Bharat

हेरवाडकरच्या यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव

क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव

हेरवाडकर स्कूलच्या विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये भाग घेऊन घवघवीत यश संपादन केले, त्या खेळाडूंचा खास गौरव करण्यात आला.

नुकत्याच झालेल्या विविध स्पर्धांमध्ये एम. व्ही. हेरवाडकरच्या विद्यार्थ्यांनी भाग घेऊन यश संपादन केले. कोप्पळ येथे झालेल्या पाचव्या अखिल भारतीय कराटे स्पर्धेत शशिप्रिया सिंगबल हिने 12 ते 13 वयोगटात प्रथम तर रिद्धी सिंगबलने 10 ते 12 वयोगटात तृतीय क्रमांक पटकाविला. लायन्स क्लब आयोजित वर्ल्ड पीस पोस्टर स्पर्धेत व वर्णकला सांस्कृतिक संघ आयोजित चित्रकला स्पर्धेत यश पाटीलने प्रथम तसेच लिंगराज महाविद्यालयात आयोजित चित्रकला स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकाविला. एम. व्ही. हेरवाडकरचे प्राचार्य सुनील कुसाने, उपप्राचार्य अरूण पाटील, सोमशेखर हुद्दार, सुहास काकतकर यांनी यांचा खास गौरव केला.

Related Stories

व्हिडीओग्राफर्स असोसिएशनतर्फे छायाचित्रण दिन

Patil_p

केंद्र सरकारच्या मोफत धान्याची मुदत वाढणार का?

Patil_p

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त नाटय़गीत गायन कार्यक्रम उत्साहात

Amit Kulkarni

तिसरे रेल्वेगेट ओव्हरब्रिज खुले करा

Amit Kulkarni

जगन्नाथराव जोशी आदर्श व्यक्तिमत्त्व

Omkar B

शेकडो सीमावासीय आंदोलनात सहभागी

Amit Kulkarni