प्रतिनिधी/ येळ्ळूर
येळ्ळूर येथील सरकारी मॉडेल शाळा, येळ्ळूरवाडी शाळेच्या क्रीडांगणावर हलगा विभागीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये येळ्ळूर, धामणे, हलगा या तीन गावांतील शाळांचा समावेश होता. या स्पर्धेचे उद्घाटन ग्रा. पं. अध्यक्ष सतीश पाटील, सदस्य प्रमोद पाटील, निवृत्त मुख्याध्यापक बी. डी. पाटील, शिक्षणप्रेमी डॉ. तानाजी पावले, उद्योजक संतोष केळवेकर यांच्या हस्ते करण्यात आले.
क्रीडा ध्वजाचे ध्वजारोहण सतीश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. येळ्ळूरवाडी मराठी शाळेचे एसडीएमसी अध्यक्ष सुनील उघाडे आणि येळ्ळूर कन्नड शाळेच्या अध्यक्षा सुनंदा हिरेमठ यांनी क्रीडाज्योतीचा स्वीकार करून सन्मान केला. यावेळी सीआरपी महेश जळगेकर, विरक्तीमठ, कृष्णा बिजगरकर उपस्थित होते. क्रीडा शिक्षक सतीश पाटील यांनी सर्व खेळाडूंना शपथ दिली. शाळेचे माजी विद्यार्थी विकास पाटील यांनी स्पर्धेसाठी चषक उपलब्ध करून दिला.
डॉ. तानाजी पावले यांनी प्रमाणपत्र, ग्रा. पं. सदस्य प्रमोद पाटील यांनी स्पर्धेसाठी लागणारी सर्व पदके उपलब्ध करून दिली. संतोष केळवेकर यांनी आर्थिक साहाय्य केले. याबद्दल सर्वांचे आभार मानण्यात आले. मारुती तमुचे यांनी सूत्रसंचालन केले. अश्विनी पाटील यांनी आभार मानले. यावेळी येळ्ळूरवाडी शाळेचे मुख्याध्यापक मोहन पाटील, क्रीडा शिक्षक नागेश केंगेरी, प्रशांत सुतार, नीता कानशिडे, वर्षा सोलापुरे यांनी परिश्रम घेतले.