Tarun Bharat

प्राथमिक विद्यार्थी अजून मोफत गणवेष, रेनकोटच्या प्रतीक्षेत

Advertisements

गोवा फॉरवर्डकडून नाराजी, मुख्य सचिवांना पत्र

प्रतिनिधी /मडगाव

सरकारी प्राथमिक शाळांमध्ये शिकणारे विद्यार्थी मोफत गणवेष आणि रेनकोट मिळण्यासाठी पात्र आहेत, मात्र त्यास विलंब होत असल्याने गोवा फॉरवर्डचे आयोजन सचिव दुर्गादास कामत यांनी नाराजी व्यक्त केली असून यासंदर्भात मुख्य सचिवाना पत्र लिहिले आहे.

साधारणपणे, शाळा पुन्हा सुरू झाल्यानंतर जूनमध्ये गणवेष आणि रेनकोटचे वाटप केले जाते. यावषी विशेषतः गणवेष आणि रेनकोट वाटपात मोठा विलंब झाला आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्षाचे चार महिने पूर्ण झाले आहेत आणि पावसाळा जवळपास संपत आला आहे. तरीही गोव्यातील गरीब विद्यार्थ्यांना अद्याप त्यांचे गणवेष आणि रेनकोट मिळालेले नाहीत, याकडे कामत यांनी लक्ष वेधले आहे.

 गरीब विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांप्रती शासनाची उदासिनता आणि दुर्लक्ष लाजिरवाणे आहे. जर सरकार दिवाळखोर बनलेले असेल आणि गणवेष व रेनकोट देणे परवडत नसेल, तर त्यांनी ते जाहीरपणे सांगितले पाहिजे. या असंवेदनशील सरकारने विद्यार्थी किंवा त्यांच्या पालकांचा वेळ वाया घालवू नये, असे कामत यांनी या पत्रात नमूद केले आहे. शिक्षणमंत्री असलेले मुख्यमंत्री तसेच शिक्षण विभागाने सदर विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांची माफी मागावी अशी आमची मागणी आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

Related Stories

फलोत्पादन महामंडळ भरारी पथक नेमणार

Amit Kulkarni

मांद्रे सप्तेश्वर पा.शि. संघाध्यक्षपदी सेबास्टीना

Amit Kulkarni

श्रीवनदेवी मुकोबा देवस्थानचा वर्धापनदिन सोहळा आजपासून

Amit Kulkarni

नव्वदीतील रामराय गावकराची चित्रशाळेच्या माध्य़मातून अखंडीतपणे ‘गणेश सेवा’

Patil_p

पाऊस्कर, आजगावकरांसह पाटणेकरांनाही नोटीस

Amit Kulkarni

माजी मंत्री माँत क्रूझ यांचा दृष्टिकोन पुढे नेणार

Amit Kulkarni
error: Content is protected !!