Primary teacher Sagar Patil passed away due to cardiac arrest
मूळचे गडहिंग्लज तालुक्यातील गिजवणे गावचे आणि सध्या शाळा आंबेगाव शाळा नं.१ चे शिक्षक सागर आप्पासाहेब पाटील (३७) यांचे मंगळवारी पहाटे ह्रदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यांच्या अकाली व आकस्मित निधनाने पत्नीसह चिमुरड्या मुलाला व आई वडिलांना धक्काच बसला. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच त्यांच्या सहकारी शिक्षकांसह प्राथमिक शिक्षण विभागातील सर्वांनाच धक्का बसला. ते कार्यरत असलेल्या आंबेगावातही शोककळा पसरली. त्यानंतर त्यांच्या सहकारी शिक्षकांनी तात्काळ सावंतवाडीत धाव घेतली. ते सावंतवाडीत राहत होते. विध्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून ते परिचीत होते. यापूर्वी त्यांनी चौकुळ, बावळाट, ओवळीये या ठिकाणी सेवा बजावली.
संध्याकाळी त्यांच्या गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, आई, वडील, बहीण असा परीवार आहे.
ओटवणे प्रतिनिधी