Tarun Bharat

पंतप्रधान हिटलरच्या मार्गाने गेल्य़ास…कॉंग्रेस नेत्याचे वादग्रस्त विधान

Advertisements

ऑनलाईन टिम / नवी दिल्ली

अग्निपथ योजना आणि ईडीकडून राहूल गांधी यांची चौकशी याच्याविरोधात देशभर कॉंग्रेसची निदर्शने होत आहेत. या आंदोलनादरम्यान कॉंग्रेसचे जेष्ठ नेते सुबोधकांत सहाय यांच्या ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हिटलरप्रमाणे मृत्यु येईल’ या वादग्रस्त वक्तव्याने राजकिय वातावरण तापण्याची चिन्हे आहेत.

देशभरात कॉंग्रेसकडून सरकार विरोधात निदर्शने केली जात आहेत. दिल्लीच्या जंतरमंतर येथे जाहीर कार्यक्रमात अग्निपथ योजना आणि अंमलबजावणी संचालनालयाने नॅशनल हेराल्ड प्रकरणात राहुल गांधींची सुरू असलेली चौकशी याचा निषेध करताना काँग्रेस नेते सुबोधकांत सहाय यांनी वादग्रस्त विधान केले. ते म्हणाले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी याच मार्गाने गेल्यास त्यांना हिटलरचा मृत्यू येईल.”

सुबोधकांत सहाय यांनी भाजप आणि मोदींच्या कारभार हुकूमशाही पद्धतीचा असल्याचे सांगून “मला वाटते की पंतप्रधान मोदी हिटलरच्या पलीकडे गेले आहेत. मला वाटतं मोदीं असेच हिटलरच्या मार्गावर चालत राहिल्यास तेसुद्धा हिटलरच्या मृत्यूने मरतील.”

Related Stories

टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेला उद्यापासून प्रारंभ

Patil_p

सांगलीत हळद व्यापाऱ्याकडून शेतकऱ्यांना १२ लाखांचा गंडा

Archana Banage

महाराष्ट्रात सलून सुरू करण्यास राज्य सरकारची परवानगी

Tousif Mujawar

पानिपतमध्ये उद्या मराठा शौर्य दिन

Abhijeet Khandekar

शिंदे-फडणवीस सरकारचं पहिलं अधिवेशन: पहिल्याच दिवशी विरोधक आक्रमक

Abhijeet Khandekar

एकनाथ शिंदे उद्या मुंबईत येणार

Archana Banage
error: Content is protected !!