Tarun Bharat

पंतप्रधान मोदींनी घेतली आईची भेट

गांधीनगर

गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकीचे रणकंदन सुरु आहे. विधानसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान झाले आहे. सोमवार, 5 डिसेंबर रोजी दुसऱया टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. त्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या आईची भेट घेतली आहे. दुपारी गांधीनगर येथील निवासस्थानी पंतप्रधान मोदी यांनी हिराबेन मोदी यांची भेट घेतली.

उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरात विधासनभेसाठी अहमदाबाद येथे मतदान करणार आहे. त्याआधी पंतप्रधान मोदी यांनी आई हिराबेन मोदी यांची भेट घेतली. पंतप्रधानांनी आईबरोबर चहा पीत गप्पाही मारल्या. त्यानंतर आईचे आशीर्वाद घेत पंतप्रधान आपल्या पुढील नियोजित कार्यक्रमासाठी रवाना झाले.

Related Stories

उत्तराखंडमध्ये आणखी 40 कोरोना रुग्ण, एकूण संख्या 357

Omkar B

अटी न ठेवल्यास चर्चेस तयार

Patil_p

घुसखोरीच्या प्रयत्नातील 3 दहशतवाद्यांचा खात्मा

Amit Kulkarni

राजस्थानातील करौलीत हिंसाचार, 42 जखमी

datta jadhav

पाकचे 8 सैनिक ठार; बंकर्स, लाँच पॅड्सही उध्वस्त

datta jadhav

प.बंगाल : पोटनिवडणुकीत भाजपचा दारुण पराभव

datta jadhav