नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी उत्तर प्रदेशचा दौरा करणार असून या दौऱयात त्यांच्याकडून बुंदेलखंड एक्स्प्रेस वे चे उद्घाटन होणार आहे. 296 किलो मीटर लांबीचा हा चौपदरी एक्स्प्रेस वे 14,850 कोटी रुपये खर्च करून निर्माण करण्यात आला असून अवघ्या 28 महिन्यात त्याची निर्मिती पूर्ण झाली आहे.
सरकार मार्ग संपर्क वाढविण्यासाठी कटिबद्ध आहे. गेल्या 8 वर्षांच्या काळात मोठय़ा प्रमाणावर देशाच्या विविध भागांमध्ये एक्स्प्रेस वे निर्माण करण्यात आले आहेत. वेगवान आणि सुरक्षित वाहतूक हे सरकारचे धोरण असून त्यानुसार विक्रमी लांबीचे रस्ते निर्माण करण्यात आले आहेत असे सरकारने स्पष्ट केले.
या एक्स्प्रेस वे मुळे गोंडा आणि इटावा हे जिल्हे एकमेकांशी जोडले जाणार आहेत. हा एक्स्प्रेस वे राष्ट्रीय महामार्ग 35 चा भाग आहे. तो चित्रकुट, बांदा, महोबा, हमिरपूर, जालौन, औरय्या आणि इटावा हे जिल्हे एकमेकांशी जोडणार आहेत. मुख्यमंत्री आदित्यनाथ उद्घाटनाला उपस्थित राहण्याची शक्यता आहे.