Tarun Bharat

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विकासाची गंगा आणली

पंचायत मंत्री माविन गुदिन्हो यांचे प्रतिपादन : म्हापसा येथे पत्रकार परिषदेत मोदींच्या कार्यकाळाची दिली माहिती

प्रतिनिधी /म्हापसा

नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यावर आज आठ वर्षे पूर्ण झाली. मोदींच्या कालावधीत राज्यात विकासाची गंगा आणली. देशात करोडो घरे उभी केली. गरीबांना शौचालय, घरे दिली. त्यांनी जी चळवळ सुरू केली ती आज आम्हाला पहायला मिळते.  कोविड काळात 190 कोटी लोकांनी कोविड लस घेतली हे मोठे ध्येय आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशासाठी गेल्या आठ वर्षात केलेले एक स्वप्नपूर्ती ध्येय आहे, असे प्रतिपादन पंचायतमंत्री माविन गुदिन्हो यांनी केले.

 म्हापसा येथे भाजपा उत्तर गोवा कार्यालयात पंचायतमंत्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आठ वर्षांच्या कार्यकाळाची माहिती देण्यासाठी बोलावलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी माजी आमदार दयानंद सोपटे, राजसिंग राणे उपस्थित होते.

अन्य कुठल्याच पंतप्रधानांना इतका मान सन्मान मिळाला नाही

पूर्वोत्तर भारतात सदैव भांडणे होत होती तेथे पूर्णतः बदल घडवून आणला आहे. तेथील अल्पसंख्याक व नागरिकांनी मोदींना पाठिंबा दिला आहे. आंतरराष्ट्रीय धोरणाकडेही पंतप्रधान मोदीनी लक्ष दिले आहे. मोदी आज जागतिक लिडर बनले आहेत. त्यांच्याकडे इतर लोक सल्ला मागतात. इतर कुठल्याच पंतप्रधानांना इतका मान सन्मान मिळाला नाही. देश सुरक्षित आहे आणि तोही मोदीसारख्या सुरक्षित हातात आहे, अशी माहिती पंचायत मंत्री माव्हीन गुदीन्हो यांनी दिली.

सरकारला जनतेची काळजी आहे

देशात पूर्वी सरकार कसा चालत होता आणि मोदीच्या नेतृत्वाखाली कसा चालत आहे हे सर्वांनी पाहिले आहे. अटल सेतू आणि येत्या 15 तारीखला मोपा विमानतळ सुरू होते. सरकारला जनतेची काळजी आहे हे दाखवून देते. नितीन गडकरी यांनीही गोव्यासाठी खूप काही दिले आहे. जुवारी पुलासाठी 2500 कोटी खर्च झाला आहे. पर्यटन क्षेत्रासाठी भरीव योजना दिल्या गेल्या आहेत, असे पंचायत मंत्री म्हणाले.

रस्त्यावर साईनबोर्डसाठी 2 कंत्राटदारांना हे कंत्राट दिले आहे. राज्यभर आता व्यवस्थितपणे सर्वत्र साईनबोर्ड लावण्यात येईल. गृहआधार योजना दिली आहे. सिलींडर कमी करण्यासाठी केंद्र सरकारकडे सर्वांनी मागणी केली आहे. येत्या काही दिवसात चांगलेच ऐकायला मिळणार आहे. राज्यात धर्मांतर होत नाही अशी एकच तक्रार आलेली आहे. पंचायत निवडणुकीत आरक्षण ठेवणे गरजेचे आहे.

Related Stories

गोवा दूरदर्शनवर आजपासून ‘झिलबा राणो’

Omkar B

मंत्रीमंडळात लवकरच फेरबदल शक्य

Omkar B

अबकारी करवाढीचा फटका

Patil_p

कोरोनाबाधीत रुग्णांसाठी गावातच कोविड निगा केंद्र

tarunbharat

फातोडर्य़ात यावेळी नक्की ‘कमळ’ फुलणार : तेजस्वी सुर्या

Amit Kulkarni

लोकप्रतिनिधींनी लोकहितासाठी वावरावे

Patil_p