Tarun Bharat

पंतप्रधान नरेंद्र मोदी जाणार जपान च्या विशेष दौऱ्यावर

दिल्ल्ली प्रतिनिधी:
पंतप्रधान नरेंद्र मोदी जपानला दोन दिवसांच्या विशेष दौऱ्यावर जाणार आहेत. 23 मे पासून हा दौरा सुरू होणार आहे.
फुमियो किशिदा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हे निमंत्रण दिले आहे.
जानेवारी मध्ये पंतप्रधान मोदींनी 14 व्या भारत-जपान वार्षिक शिखर परिषदेत फुमियो किशिदा यांची भेट घेतली होती.
पीआयबीने दिलेल्या माहितीनुसार, यावेळी दोन्ही देश सामरिक आणि जागतिक भागीदारी मजबूत करण्याच्या दिशेने संयुक्त प्रयत्न वाढविण्यावर चर्चा करतील.

जपानमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘क्वॉड लीडर्स समिट’मध्ये सहभागी होतील. या शिखर परिषदेत क्वाडमधील 4 देशांचे नेते क्वाडमध्ये होत असलेल्या प्रगतीचा आढावा घेतील. भारत, जपान, अमेरिका आणि ऑस्ट्रेलियाचाही या क्वाडमध्ये समावेश आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांच्यासोबत होणाऱ्या द्विपक्षीय बैठकीतही पंतप्रधान मोदी सहभागी होणार आहेत. जिथे द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्यावर चर्चा केली जाईल.
ऑस्ट्रेलियाचे नवनिर्वाचित पंतप्रधान अँथनी अल्बानीज हेही प्रथमच क्वाड लीडर्स कॉन्फरन्समध्ये सहभागी होणार आहेत.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बहुआयामी सहकार्य आणि परस्पर हिताच्या प्रादेशिक, जागतिक मुद्द्यांवर ते त्यांच्याशी चर्चा करतील.

Advertisements

Related Stories

खाजगी लॅबमध्ये आता निम्म्या दरात होणार कोरोना चाचणी ; महाराष्ट्र सरकारचा निर्णय

Rohan_P

चौका चौकात झळकले पोस्टर बॉईज; इच्छुकांच्या डिजिटल फलकांनी शहर व्यापले

Abhijeet Shinde

एनडीआरएफची टीम कोल्हापुरात दाखल होणार

Abhijeet Shinde

सचिन वाझे मुख्यमंत्री ठाकरे यांना ‘फसवत’ होता, अँटिलिया प्रकरणात दिली खोटी माहिती

Abhijeet Shinde

घोटाळे बाहेर काढण्यासाठी दोन दिवसांनी जाणारच – सोमय्या

datta jadhav

उत्तर कोरियामध्ये ज्यो बायडेन करणार विशेष दूताची नियुक्ती

Patil_p
error: Content is protected !!