Tarun Bharat

जपानचे पंतप्रधान भारतातून थेट युक्रेन दौऱयावर

बिडेन यांच्याप्रमाणे पोलंडमधून रेल्वेप्रवासाद्वारे कीव्हमध्ये दाखल ः झेलेंस्की यांच्याशी चर्चा करणार

वृत्तसंस्था / कीव्ह

जपानचे पंतप्रधान फूमियो किशिदा हे जागतिक समुदायाला चकित करत युक्रेनसाठी रवाना झाले आहेत. युक्रेनचे अध्यक्ष वोल्दोमिर झेलेंस्की यांची ते भेट घेणार आहेत. जपानच्या पंतप्रधानाने युद्धात सामील कुठल्याही देशाचा दौरा करण्याची ही पहिलीच वेळ आहे. याचबरोबर जी7 गटाचे अध्यक्ष म्हणून कुठल्याही आशियाई देशाच्या प्रमुखाचा हा पहिलाच युक्रेन दौरा आहे.

भारत दौरा संपविल्यावर किशिदा हे पोलंडमध्ये पोहोचले. पोलंडमधून रेल्वेप्रवास करत ते मंगळवारी सकाळी युक्रेनमध्ये पोहोचले आहेत. स्वतःच्या दौऱयादरम्यान किशिदा यांनी अध्यक्ष झेलेंस्की यांच्या नेतृत्वाखाली स्वतःच्या देशाच्या रक्षणासाठी लढत असलेल्या युक्रेनियनांबद्दल आदर त्यांनी व्यक्त केला आहे. तसेच जपान आणि जी7 देशांचा अध्यक्ष म्हणून त्यांनी युक्रेनला पाठिंबा दर्शविला आहे.

रशियावर अनेक निर्बंध

किशिदा यांनी यापूर्वी जानेवारीमध्ये झेलेंस्की यांच्याशी फोनवरून चर्चा केली होती. तेव्हा युक्रेनच्या अध्यक्षांनी किशिदा यांना कीव्ह दौऱयाचे निमंत्रण दिले होते. जपानने यापूर्वीही अनेकदा रशियाच्या युक्रेनवरील हल्ल्याला विरोध दर्शविला आहे. याचबरोबर जपानने युद्धाप्रकरणी रशियावर अनेक कठोर निर्बंध लादले आहेत. तसेच युक्रेनला मानवीय तसेच आर्थिक मदत केली आहे.

जपानकडून 7 अब्ज डॉलर्सची मदत

जपानने आतापर्यंत युक्रेनला 7 अब्ज डॉलर्सची मदत केली आहे. याचबरोबर जपानने युद्धात मदतीदाखल युक्रेनला अनेक बिगर-लढाऊ उपकरणे म्हणजेच हेल्मेट्स, बुलेटप्रूफ जॅकेट्स, ड्रोन्स आणि लोकोपयोगी सामग्री पुरविली आहे. तसेच जपानने युक्रेनमधून आलेल्या सुमारे 2 हजार लोकांना आश्रय दिला आहे.

भारत दौरा केला पूर्ण

तत्पूर्वी 20 मार्च रोजी जपानच्या पंतप्रधानांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेत द्विपक्षीय चर्चा केली होती. यादरम्यान त्यांनी रशियाच्या युक्रेनवरील हल्ल्याची निंदा केली होती. तर भारताने यादरम्यान स्वतःची जुनी भूमिका कायम ठेवत रशियावर टीका करणे टाळले होते.

भारताला जी7 परिषदेचे निमंत्रण

पंतप्रधान नरेंद्र मोदींना हिरोशिमामध्ये होणाऱया जी-7 परिषदेसाठी निमंत्रित केले असून त्यांनी परिषदेत सहभागी हेण्यास होकार दर्शविला असल्याचे किशिदा यांनी म्हटले होते. भारत आणि जपान यांच्यातील संबंध अत्यंत दृढ आहेत. क्वाड या गटात दोन्ही देश सहभागी आहेत. तसेच दोन्ही देशांमधील आर्थिक संबंध अत्यंत वृद्धींगत होत आहेत.

Related Stories

दर 15 मिनिटांमध्ये एकदा पाहतोय फोन

Patil_p

भारताच्या निर्णयाची गेट्स यांच्याकडून प्रशंसा

Patil_p

हाँगकाँगमध्ये कोरोनाचा उद्रेक, प्रशासनाची तारांबळ

Omkar B

नेपाळमुळे बिहारला पूरस्थितीचा धोका

datta jadhav

न्यूझीलंडची क्रूजवरील बंदी कायम

Patil_p

पाकला मदत करण्यास फ्रान्सचा नकार

datta jadhav
error: Content is protected !!