Tarun Bharat

27 जानेवारीला पंतप्रधान करणार ‘परीक्षा पे चर्चा’

विद्यार्थी, शिक्षक अन् पालक होणार सामील

वृत्तसंस्था  / नवी दिल्ली

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. यंदा ‘परीक्षा पे चर्चा’चे आयोजन 27 जानेवारी रोजी होणार आहे. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांसाब्sात संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाचे आयोजन केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून केले जाणार आहे. पंतप्रधानांच्या या कार्यक्रमाची माहिती केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिली आहे.

मायगोव्हवरील स्पर्धांच्या आधारावर निवडण्यात आलेले विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांना शिक्षण मंत्रालयाकडून पीपीसी किट भेटवस्तू म्हणून प्रदान करण्यात येणार आहे. पंतप्रधान दरवर्षी ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांशी संवाद साधत असतात.  यादरम्यान पंतप्रधान हे विद्यार्थ्यांना परीक्षेच्या कालावधीत तणावमुक्त राहण्यासाठीचा मंत्र देत असतात. या कार्यक्रमाचे विविध वाहिन्यांवरून थेट प्रसारण केले जात असते.

पंतप्रधान मोदींनी 2018 मध्ये पहिल्यांदा ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रम केला होता. तेव्हापासून पंतप्रधान दरवर्षी या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांशी संवाद साधत राहिले आहेत.  या कार्यक्रमाद्वारे पंतप्रधान हे विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत असतात. 1 एप्रिल 2022 रोजी आयोजित झालेल्या या कार्यक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना विशेष सूचना त्यांनी केल्या होत्या. मागील वर्षी या कार्यक्रमाचे आयोजन नवी दिल्लीतील तालकटोरा स्टेडियममध्ये करण्यात आले होते. तसेच याकरता सुमारे 15.7 लाख जणांनी नोंदणी केली होती.

Related Stories

चोवीस तासात आढळले जवळपास 48 हजार रुग्ण

Patil_p

भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर मोदींनी बोलावली सर्वपक्षीय बैठक

datta jadhav

भाजपच्या गुजरात प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील

datta jadhav

पूलांच्या आयुर्मानासंबंधी धोरण येणार

Patil_p

सर्वोत्तम शहरांमध्ये बेंगळूर अव्वल

Amit Kulkarni

समीर वानखेडेंची चेन्नईला DGTS पदी बदली

datta jadhav