Tarun Bharat

रोटरी क्लबच्यावतीने मुख्याधिकारी संतोष जिरगे यांचा सत्कार

Advertisements

Principal Santosh Jirge felicitated on behalf of Rotary Club

इंडियन स्वच्छता लीग स्पर्धेत मालवण नगरपरिषदेला प्राप्त झाला देशपातळीवरील विशेष पुरस्कार ; त्या निमित्ताने रोटरी क्लबच्या वतीने सन्मान सोहळाकेंद्र शासनाने आयोजित केलेल्या स्वच्छ अमृत महोत्सव अंतर्गत इंडियन स्वच्छता लीग स्पर्धेत मालवण नगर परिषदेचा विशेष पुरस्कार देऊन देशपातळीवर सन्मान करण्यात आला. केंद्रीय मंत्री कौशल किशोर यांच्या हस्ते मालवण नगरपरिषद मुख्याधिकारी तथा प्रशासक संतोष जिरगे यांना दिल्ली येथे सन्मानित करण्यात आले. या पार्श्वभूमीवर मालवण रोटरी क्लबच्या वतीने मुख्याधिकारी तथा प्रशासक संतोष जिरगे यांचा मंगळवारी विशेष सत्कार करण्यात आला.

मालवण नगरपरिषद शहर समन्वयक निखिल नाईक, बांधकाम पर्यवेक्षक सुधाकर पाटकर, लिपिक महेश परब, पाणी पुरवठा अभियंता राजा केरीपाळे यांनाही चांगल्या सेवेबाबत रोटरी क्लबच्या वतीने सन्मानित करण्यात आले. मालवण नगरपरिषदेच्या सर्व कर्मचारी यांचेही रोटरी क्लब सदस्यांनी कौतुक केले.

मालवण / प्रतिनिधी

Related Stories

विर्डी येथे “जागतिक मृदा दिना”निमित्ताने शेतकऱ्यांना मार्गदर्शन

Anuja Kudatarkar

शाळा, महाविद्यालये 100 टक्के बंद

NIKHIL_N

गळ टोचणी कार्यक्रमाने आणले अंगावर शहारे!

Patil_p

जिह्यातील अडिच हजार शाळांतील विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण

Patil_p

सावंतवाडी पालिकेच्या ताफ्यात हायड्रॉलिक शिडी

NIKHIL_N

मिरजोळी ग्रामपंचायतीकडून खोटा पत्रव्यवहार

Patil_p
error: Content is protected !!