Tarun Bharat

500 रुपयांत कारागृहाचा अनुभव

Advertisements

कुंडली किंवा पत्रिकेवर अनेकांचा विश्वास असतो. कुंडलीत बंधन योग असेल तर भविष्यकाळात कारागृह यात्रा घडणे शक्य असते. कारागृहात जावे लागू नये म्हणून अनेक लोक हजारो रुपये देऊन एखादा दिवस कारागृहात जाऊन राहतात. तसे केल्याने बंधन योग दूर होतो, अशी अनेकांची श्रद्धा आहे.

उत्तराखंडच्या हलद्वानी कारागृहाच्या प्रशासनाने लोकांच्या या श्रद्धेला वाट करून देण्यासाठी एक योजना क्रियान्वीत केली आहे. त्यानुसार आपल्या बंधनयोगाचा दोष दूर करण्यासाठी जर कोणाला मुद्दामहूनच कारागृहात वास्तव्य करावयाचे असेल तर 500 रुपयांचे शुल्क भरून ते करता येईल, अशी व्यवस्था या योजनेत आहे. यासाठी कारागृहाला एक दीर्घिका (एक्स्टेन्शन) बांधण्यात आली आहे. या कारागृहाचे अधीक्षक सतीश सुखीजा यांनी ही माहिती दिली. हलद्वानी कारागृहाची निर्मिती 1903 मध्ये झाली होती. या कारागृहाला जोडून एक शस्त्रगृह होते. ब्रिटिशांच्या काळात येथे शस्त्रास्त्रांचा साठा केला जात असे. स्वातंत्र्यानंतर शस्त्रसाठा ठेवण्याचे बंद झाले. त्यामुळे बराच काळ ही जागा रिकामी होती.

आता याच जागी दीर्घिका तयार करण्यात आली असून तेथे अशा इच्छूकांची सोय करण्यात आली आहे. त्यामुळे कुंडली किंवा पत्रिकेत बंधन योग असणारे असंख्य लोक 500 रुपये देऊन एक दिवसभर या दीर्घिकेमध्ये राहतात. त्याने आपल्या पत्रिकेतील दोष दूर झाल्याचे समाधान त्यांना लाभते. अनेक लोक याला अंधश्रद्धाही म्हणतात. तथापि विश्वास असणाऱया लोकांच्या दृष्टीने हे कारागृह वास्तव्य त्यांचे भवितव्य उज्ज्वल बनविण्यासाठी आणि भविष्यात असे काही संकट ओढवू नये याची तरतूद करण्यासाठी आवश्यक असते. यामुळे कारागृहाच्याही मोठय़ा उत्पन्नाची सोय झाली आहे. प्रति दिन 100 हून अधिक ‘श्रद्धाळू’ अशाप्रकारे कारागृह यात्रा करतात. आता हा प्रयोग अन्य कारागृहात होऊ शकतो.

Related Stories

चर्चा हाच तोडगा काढण्याचा मार्ग

Patil_p

दक्षिण-पश्चिम अन् दक्षिणपूर्व आशियाई देशांमधील फैलाव

Patil_p

स्वामीप्रसाद यांच्यासह 8 आमदारांचा ‘सप’प्रवेश

Patil_p

69 हजार शिक्षक भरती प्रकरणाचा खुलासा करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याची बदली

Rohan_P

एल्गार, पीटरसन यांची शानदार अर्धशतके

Patil_p

“मला कळेना भाजपानं ‘हे’ काँट्रॅक्ट कधी घेतलं ?” – शरद पवार

Abhijeet Shinde
error: Content is protected !!