Tarun Bharat

कोलवाळ सेंट्रल जेलमध्ये कोकेनसह तुरुंग रक्षकास अटक

जेलची सुरक्षा व्यवस्था पुन्हा आली चव्हाटय़ावर

प्रतिनिधी /म्हापसा

Advertisements

कोलवाळ येथील मध्यवर्ती कारागृहात तुरुंग रक्षकाला 5 ग्रॅम कोकेनसह प्रवेशद्वारावर डय़ुटी बजावत असलेल्या आयआरबीच्या पोलिसांनी तपासणीवेळी ताब्यात घेऊन अटक केली. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कोकेनची किंमत 52 हजाराच्या घरात जाते. कुंपणच जर शेत खाऊ लागले तर सामान्य नागरिकांचे काय? या प्रकरणामुळे जेल अधिकाऱयांची सुरक्षा व अमली पदार्थांचा कारागृहातील व्यवसाय पुन्हा एकदा वेशीवर आला आहे.

 या प्रकरणामुळे संशयित आरोपी, कैदी व तुरंगातील अधिकारी यांचे साटेलोटे उघडय़ावर पडले आहेत. याप्रकरणी कोलवाळ पोलिसांनी संशयित आरोपी सुरज गावडे (जॉफिलनगर-फोंडा) याच्या विरोधात गुन्हा नोंद केला असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक जिवबा दळवी यांनी दिली. खुनाच्या आरोपाखाली कोलवाळ जेलमध्ये शिक्षा भोगत असलेल्या विकास भगत (काणकोण) या कैद्याला देण्यासाठी हे कोकेन आणले होते.

 कैदी, अधिकाऱयांचे साटेलोटs

अलिकडेच कारागृहाच्या प्रवेशद्वाराबाहेर मनुष्यबळ विकास महामंडळाच्या सुरक्षा रक्षकाला अमलीपदार्थप्रकरणी अटक झाली होती. दर पंधरा दिवसांनी असा प्रकार येथे घडत असतो. विशेष म्हणजे कोलवाळ तुरुंगात आतमध्ये प्रवेश करतेवेळी तीन गेटवर तपासणी होते. असे असतानाही आतमध्ये अमलीपदार्थांचा व्यवहार तसेच पुरवठा कसा होतो हा एक मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. अधिकारीवर्ग व कैदी यांचे साटेलोटे असल्याने अमलीपदार्थ सहजपणे आत जातो, असे आजवरच्या चौकशी अंती आढळून आले आहे.

उपअधीक्षक जिवबा दळवी यांच्या नेतृत्वाखाली कोलवाळ पोलीस स्थानकाचे निरीक्षक सोमनाथ माजिक हे तापस करत आहेत. आयआरबीचे पोलीस निरीक्षक सुशांत जोशी व त्यांच्या पथकाने ही कारवाई करुन गेट-सी वर संशयिताला अटक केली. या कारवाईत उपनिरीक्षक सुशांत सांगोडकर, सोनम वेर्णेकर, हवालदार रामा नाईक, सुधीर परब, शिपाई संतोष नार्वेकर, समीप साळगावकर यांनी या कारवाईत सहभाग घेतला. संशयित सुरज गावडे याला कोलवाळ पोलीस स्थानकाच्या कोठडीत ठेवण्यात आले आहे.

Related Stories

अमित पालेकर यांना वाढता पाठिंबा

Amit Kulkarni

डिसेंबर पूर्वी मांदेतील सर्व प्रकल्प आणि नवीन प्रकल्पाचे भूमिपूजन होईल

Patil_p

राज्यात 84 कोरोनामुक्त, 42 नवे रुग्ण

Patil_p

कोलवा सर्कल जवळ कारने घेतला पेट

Amit Kulkarni

डिचोलीत भाजपकडून उमेदवारासाठी प्रयत्नांची शिकस्त

Amit Kulkarni

आपच्या काळ्या केकवर ‘हात-कमळाचा’ संगम

Patil_p
error: Content is protected !!