पुणे / वार्ताहर :
पुण्यातील हडपसर पोलिसांच्या लॉकअपमध्ये असलेल्या आरोपीने डोके लॉकअपमधील भिंतीवर व लोखंडी गजावर आपटत आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार घडला.
अमोल राजू क्षीरसागर (वय 25, रा. पुणे) असे आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार प्रशांत लक्ष्मण जामदार (वय 42) यांनी आरोपी विरोधात फिर्याद दाखल केली आहे.
अधिक वाचा : सत्येंद्र जैन यांचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल; कोठडीतच तुरुंग अधिकाऱ्यासोबत ‘VIP चर्चा’
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी क्षीरसागर हा बलात्काराच्या गुन्ह्यात अटकेत आहे. त्याने 24 नोव्हेंबरला दुपारी साडेचार ते पाच आणि रात्री साडेसात ते आठ या दरम्यान डोके लॉकअपमधील भिंतीवर व लोखंडी गजावर जोरजोरात आपटून स्वत:ला गंभीर जखमी केले. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला तातडीने उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल केले. तिथेही लघवीला जाण्याचा बहाणा करुन वॉशरुममधील काचेने स्वत:च्या गळयावर जखमा करुन घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी पुढील तपास हडपसर पोलीस करत आहेत.