वृत्तसंस्था/ मुंबई
दिल्ली कॅपिटल्स संघातील सलामीचा फलंदाज पृथ्वी शॉ याला रविवारी रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. पृथ्वीला टायफॉईडची बाधा झाली होती आणि त्याच्यावर या रूग्णालयात वैद्यकीय उपचार चालू होते.
काही दिवसापूर्वी 22 वर्षीय पृथ्वी ला ताप आल्याने त्याला तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात होते. या व्याधीतून तो बरा झाला असला तरी सोमवारच्या सामन्यात तो खेळेल किंवा नाही याबाबत संघाच्या वैद्यकीय पथकाचा निर्णय महत्त्वाचा राहील. पृथ्वीने या स्पर्धेतील आपला शेवटचा सामना लखनौ संघाविरूद्ध 1 मे रोजी खेळला होता. त्यानंतर त्याला आपल्या संघाच्या तीन सामन्यामध्ये खेळता आले नव्हते. शॉ ने या स्पर्धेत आतापर्यंत 28.77 धावांच्या सरासरीने 259 धावा जमविल्या आहेत.