Tarun Bharat

घडाळ्याचे काटे उलटे फिरवावे लागले तर फिरवावे लागतील पण लोकशाही वाचवावी लागेल; पृथ्वीराज चव्हाण

Prithviraj Chavan : देशात आणि राज्यात लोकशाही शिल्लक आहे की नाही याबाबत आम्हाला शंका आहे. बेकायदेशीरपणे निर्णय घेतले जात आहेत. लोकशाही धाब्यावर बसवली जात आहे. देशाची वाटचाल हुकूमशाहीकडे चालली आहे. त्यामुळे उद्या घड्याळाचे काटे उलटे फिरवावे लागले तरी फिरवावे लागतील. पण लोकशाही वाचवावी लागेल, असं वक्तव्य राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी केले. आज कोल्हापुरात पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी मोदी सरकार आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांच्यावर सडकून टीका केली. तर अब्दुल सत्तार यांनाच आता शिक्षण मंत्री करतील अशी खोचक टिका सत्तार प्रकरणावर केली.

यावेळी बोलताना ते म्हणाले, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने उद्यापासून 15 ऑगस्टपर्यंत प्रत्येक जिल्ह्यात किमान 75 किलोमीटरपर्यंत यात्रा निघणार आहेत. या यात्रेचा पदपस्पर्श प्रत्येक तालुक्याला होणार आहे. ही यात्रा काँग्रेसने आयोजित केली असली तरी तिरंग्याची आहे. त्यामुळे सर्वांनी या यात्रेत सहभागी व्हावे, असं आवाहन पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं आहे. पुढे बोलताना ते म्हणाले, अर्थव्यवस्था डबघाईला गेलीय. त्यासाठी कोरोनाचं (Corona) कारण दिलं जात आहे. मात्र, त्यात सत्य नाही. कोविडच्या आधीपासून अर्थव्यवस्थेला घरघर लागली होती, असा दावाही त्यांनी केला.

हेही वाचा- पन्हाळगडावरील चार दरवाज्याच्या पायथ्याची दरड खचली –


राज्यपालांच्यावर टीका करताना ते म्हणाले, राज्यपालाना काही बंधनं नसते. त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी केला. तीन वर्षे विधासभा अध्यक्षांची निवड थांबवणाऱ्या राज्यपालांनी एका रात्रीत अध्यक्ष निवडीला परवानगी दिली. हे सगळं बेकायदेशीर आहे. न्यायालायत हे टिकणार नाही. न्यायालयाचा निर्णय नसल्यामुळेच मंत्रिमंडळ विस्तार रखडलाय असेही ते म्हणाले. घेतलेले सगळे निर्णय रद्द करा हे आम्ही कधीच ऐकलं नव्हतं, असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला.

हेही वाचा- धरणक्षेत्रात पावसाचा जोर कायम; नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा, हुपरी-कोल्हापूर मार्ग बंद


केंद्र सरकारवर निशाणा साधताना ते म्हणाले, मोदी सरकारने आता पर्यंत भरमसाठ कर्ज काढलं आहे. आता नवीन कर्ज मिळेल असं वाटत नाही. कर वाढवले आहेत पंडित नेहरूंच्या दूरदृष्टीतून उभ्या राहिलेल्या संस्था विकल्या जात आहेत. नोटबंदी सुद्धा फसली आहे. अनेक अविचारी निर्णय केंद्र सरकारकडून घेतले जातं आहेत. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी शिवसेनेला संपवून टाकण्याचे संकेत दिले आहेत. या आधी काँग्रेस मुक्त भारतची घोषणा केली होती. चुकून दुसरं सरकार आलं तर लोटस ऑपरेशन केलं जात आहे. अडाणीची संपत्ती किती आणि कशी वाढली हे जगातील आठवं आश्चर्य आहे, असंही ते म्हणाले.

Related Stories

कोरोना महामारीतही ‘मृत्यू दरात घट’..!

Archana Banage

केंद्रिय कर्मचाऱ्यांना आता लोकलमधून प्रवास करण्यास परवानगी : आशिष शेलार

Tousif Mujawar

आरग-लक्ष्मीवाडीत विवाहितेचा विहिरीत पडून मृत्यु

Archana Banage

वानखेडेंना आणखी एक दणका; ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल

datta jadhav

दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन कोरोनाग्रस्त

Tousif Mujawar

फुटीच्या भीतीने मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर

Archana Banage