Tarun Bharat

विधानपरिषद निवडणुकीत मतदान न करणाऱ्या ‘त्या’ आमदारांवर कारवाई करा; पृथ्वीराज चव्हाण यांची मागणी

ऑनलाईन टीम/तरुण भारत

विधानपरिषदेतील निवडणुकीमध्ये (legislative council election) काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव झाला. या निवडणुकीत काँग्रेस (Congress) उमेदवारांची मतं फुटली होती. यांनतर या फुटलेल्या मतांची चर्चा होती. या निवडणुकीत उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव झाला होता. त्यानंतर आता काँग्रेसमधील अंतर्गत वाद आता समोर आला आहे. तर फुटलेल्या उमेदवारांवर कारवाई करण्याची मागणी काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने केली आहे.

विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे (chandrakant handore) हे पराभूत झाले. काँग्रेसने हंडोरे यांना २९ मतांचा कोटा ठेवला असताना त्यांना फक्त २२ मते पडली. याचा अर्थ काँग्रेसची सात मते फुटली असून या सात फुटीर आमदारांवर कारवाई करावी, अशी मागणी पृथ्वीराज चव्हाण (prithviraj chavan) यांनी पक्षाचे महाराष्ट्र प्रभारी एच.के.पाटील यांच्याकडे केली आहे.

विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसकडे ४४ मते होती. काँग्रेस हायकमांडकडून पहिल्या पसंतीचे उमेदवार म्हणून चंद्रकांत हंडोरे यांना मतदान करण्याचे आदेश देण्यात आले होते. तर उर्वरित मते दुसरे उमेदवार भाई जगताप यांना मिळणार होती. मात्र या निवडणुकीत भाई जगताप विजय होऊन हंडोरे यांचा पराभव झाल्याने कॉंग्रेस आमदारांनीच पक्षशिस्त न पाळल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी पृथ्वीराज चव्हाण यांनी काँग्रेसच्या वरिष्ठांकडे तक्रार केली आहे.

Related Stories

तीन लाखाची खंडणी मागणाऱया गुंडास अटक

Patil_p

कोरोनाची धास्ती : मध्य प्रदेश सरकारची नवी नियमावली जाहीर

Tousif Mujawar

पुणे विभागातील 6 लाख 60 हजार 776 रुग्ण कोरोनामुक्त!

Tousif Mujawar

भारतीय वंशाच्या CEO चा एक कॉल आणि ९०० कर्मचारी झाले बेरोजगार

Archana Banage

राज ठाकरेंवर यशस्वी शस्त्रक्रिया ; आज मिळणार डिस्चार्ज

Archana Banage

महाराष्ट्रात 4,268 नवे कोरोनाबाधित ; 87 मृत्यू

Tousif Mujawar