Tarun Bharat

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर पृथ्वीराज चव्हाण यांची प्रतिक्रिया; म्हणाले, घटनांचे घड्याळ आता उलट फिरवणार का ?…

Advertisements

Maharashtra Political Crisis : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा वाद मिटता- मिटेना झाला आहे. काल सुप्रीम कोर्टाने पक्षाच्या चिन्हाबाबत कोणताही निर्णय घेऊ नका असा आदेश निवडणूक आयोगाला दिला. मात्र अंतिम निर्णय हा ८ ऑगस्टला निर्णय देणार असल्याचे सांगितले. कोर्टाच्या या निर्णयानंतर काल विरोधीपक्षांनी तसेच शिवसेनेतील काही नेत्यांना याबाबत प्रतिक्रिया दिल्या. दरम्यान आज काॅग्रेस नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज्यात घडलेल्या चुकीच्या घटनांचे घड्याळ आता उलट फिरवणार आहे का? असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. ते सांगलीत बोलत होते.

यावेळी बोलताना ते म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाचे काय चाललंय हेच कळत नाही. कारण निकालाची दिरंगाई अनाकलनीय आहे. न्यायालाकडून निकाल येईल असं अपेक्षित होतं. पण राज्यातील हा सत्तासंघर्ष फारच लांबलचक आणि गुंतागुंतीचा झाला आहे. राज्यात घडलेल्या चुकीच्या घटनांचे घड्याळ आता उलट फिरवणार आहे का? असा सवाल चव्हाण यांनी उपस्थित केला.

हेही वाचा- कर्जाचा हप्ता आणखी वाढणार; RBI ने रेपो दरात केली वाढ


पुढे बोलताना ते म्हणाले की, निलंबनाची कारवाई झालेली नसताना नव्या मुख्यमंत्र्यांना शपथ देणे हेच चुकीचं होतं. त्यानंतर विधानसभा अध्यक्षांची निवडही होऊन गेलेली आहे. पण आता या घटना पुन्हा मागे घेता येणार आहेत का असाही सवाल त्यांनी केला.

Related Stories

जय गणेश ज्ञानवर्धन अभियानातील विद्यार्थ्यांचा 12 वीचा निकाल शंभर टक्के

Rohan_P

झिका विषाणू : केंद्र सरकारने केरळमध्ये पाठवली तज्ज्ञांची टीम

Rohan_P

पश्चिम बंगालमध्ये बॉम्बहल्ला; सहा भाजपा कार्यकर्ते जखमी

Abhijeet Shinde

सोलापुरात 82 कोरोना पॉझिटिव्ह असल्याची आकडेवारी चुकीची: जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर

Abhijeet Shinde

परराज्यातून घरी परतणाऱ्या बिहारी मजुरांचा खर्च बिहार सरकार करणार : नितीश कुमार

Rohan_P

उध्दव ठाकरे गटाला दिलासा ; महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष आता घटनापीठाकडे!

Abhijeet Khandekar
error: Content is protected !!