प्राइम व्हिडिओने स्वतःची आगामी एपिक स्पाय-थ्रिलर सीरिज ‘सिटाडेल’चा हाय-ऑक्टेन ऑफिशियल ट्रेलर प्रदर्शित केला आहे. या ग्लोबल सीरिजच्या पहिल्या सीझनमध्ये 6 एपिसोड्स आहेत, यातील 2 एपिसोड्स 28 एप्रिलपासून प्राइम व्हिडिओवर प्रसारित होणार आहेत. ‘सिटाडेल’ ही जगभरातील 240 हून अधिक देशांमध्ये पाहता येणार आहे. ‘सिटाडेल’चा प्रीमियर इंग्रजी, हिंदी, तमिळ, तेलगू, मल्याळी आणि कन्नडमध्ये होणार आहे.
सिटाडेल ही स्वतंत्र स्वरुपात काम करणारी जागतिक हेरयंत्रणा असल्याचे या सीरिजमध्ये दर्शविण्यात आले आहे. लोकांना सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी या यंत्रणेवर असल्याचे ट्रेलरमध्ये दिसुन येते. सिटाडेल या सीरिजमध्ये प्रियांका चोप्रा ही नादिया सिंह या व्यक्तिरेखेत दिसून येणार आहे. तर प्रसिद्ध अभिनेता रिचर्ड मॅडेन हा मेसन केन ही व्यक्तिरेखा साकारणार आहे.
या सीरिजमध्ये स्टेनली टुकीने बर्नार्ड ऑरलिक, तर लेस मॅनविलने डाहलिया आर्चर ही भूमिका साकारली आहे. सिटाडेल सीरिजमध्ये ओसि इखिले, एशले कमिंग्स, रोलँड मोलर, काओलिन स्प्रिंगल हेंड्रिक्स हे कलाकार दिसून येणार आहेत. या सीरिजची हिंदी भाषेतील आवृत्तीही निर्माण केली जात आहे. यात वरुण धवन आणि समांथा रुथ प्रभू दिसून येणार आहेत.