नवी दिल्ली
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यानंतर आता प्रियांका गांधी यांनाही कोरोनाचा फटका बसला आहे. वैद्यकीय अहवालाअंती आपल्यामध्ये कोरोनाची सौम्य लक्षणे आढळल्याचे प्रियांका गांधी यांनी सांगितले. पॉझिटिव्ह अहवालानंतर त्यांनी स्वतः विलगीकरणात राहण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच आपल्या संपर्कातील लोकांना सर्व आवश्यक प्रोटोकॉल पाळण्याचा सल्ला दिला आहे. यापूर्वी 1 जून रोजी सोनियांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्याचदिवशी सेवादलाने आयोजित केलेल्या गौरव यात्रेच्या कार्यक्रमात त्या सहभागी झाल्या होत्या.