वार्ताहर /हरमल
येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने 29 व्या उत्सवाच्या निमित्ताने देणगी कुपन्स ठेवल्या होत्या,त्याच्या बक्षीस विजेत्यांना नुकतीच गणेशोत्सव सभागृहात बक्षिसे देण्यात आली.
ह्यावेळी गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष दिगंबर कोरकणकर, उपाध्यक्ष सुखानंद नाईक, अभय नाईक,भरत वस्त,खजिनदार आपा वायगंणकर,सदस्य राजन वायंगणकर,दादू गडेकर,प्रकाश रामजी,सूर्यकांत कोरकणकर,हनुमान गोकर्णकर, साईदास नाईक आदी उपस्थित होते.
या समारंभात विठोबा पार्सेकर (वॉशिंग मशीन),प्रमोद जोशी (रेफ्रिजरेटर)कुणाल मयेकर (टीव्ही),बाबाजी कोरकणकर(मोबाईल)दादू गडेकर (सायकल)प्रकाश रामजी,भूषण बर्डे,नितीन गावडे,शंकर नाईक,सुयश कोरकणकर,विलास बानकर, रतन नाईक याना (फॅन) बक्षिसे देण्यात आले.यंदाच्या उत्सवात देणगी कुपन बक्षिसे पुरस्कृत व खरेदी करून मंडळास सहकार्य केल्याबद्दल मंडळाचे अध्यक्ष दिगंबर कोरकणकर यांनी आभार मानले.