प्रतिनिधी /बेळगाव
दालमिया सिमेंट बेळगाव विभागाच्यावतीने मंगळवारी सुभाषनगर येथील कार्यालयात जिल्हय़ातील लकी विजेत्यांना एलईडी टीव्ही भेट देण्यात आली. दालमिया सिमेंटने मागील काही दिवसांपासून सुरू केलेल्या ‘एव्हरी होम हॅपी’ या योजनेला बेळगाव परिसरात उत्तम प्रतिसाद मिळाला. यातील विजेत्यांना बक्षिसांचे वितरण करण्यात आले. तसेच लोकाग्रहास्तव ही योजना 15 सप्टेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे.
बेळगाव येथील दीपक कंग्राळकर, संकेश्वर येथील प्रदीप श्रावणेर, गोकाक येथील अडव्याप्पा व रेहमतुल्ला मुर्तजा यांना एलईडी टीव्ही देण्यात आली. दालमिया सिमेंटचे महाराष्ट्र व कर्नाटक राज्य व्यवस्थापक अमित मोदी यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली. 100 ते 300 पोती सिमेंट खरेदी करणाऱया ग्राहकांसाठी दालमिया सिमेंटने लकी ड्रॉ कुपन ठेवली होती. यातील पहिल्या क्रमांकाला कार, दुसऱया क्रमांकाला दुचाकी, तिसऱया क्रमांकाला थायलंड ट्रीप तर चौथ्या क्रमांकाला टीव्ही देण्यात आली.
उपस्थित ग्राहक व डीलर्सनी दालमिया सिमेंटची गुणवत्ता व सेवेबद्दल कौतुक केले. यावेळी शिवराम एन्टरप्रायझेस, मुगुरसाब मुल्ला, अलाईट टेडर्स यांच्यासह दालमिया सिमेंटचे सेल्स मॅनेजर शाम कित्तूर, सेल्स ऑफिसर नितीन फडतरे सोमनाथ बिर्जे, अनिकेत पाटील, टेक्निकल हेड अमित पाटील, मार्केटिंग ऑफिसर नीळकंठ पाटील यांच्यासह इतर उपस्थित होते.