लोकमान्य सोसायटीच्या महांतेशनगर शाखेतर्फे कणबर्गीत उपक्रम
प्रतिनिधी /बेळगाव
गणेशोत्सवाचे औचित्य साधून लोकमान्य सोसायटीच्या महांतेशनगर शाखेच्यावतीने कणबर्गी येथील सरकारी हायर प्रायमरी मराठी शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी गणरंग चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
या स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. या स्पर्धेत पहिली ते सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात भाग घेतला होता. पहिली ते चौथीपर्यंत ग्रुप ए आणि पाचवी ते सातवीपर्यंत ग्रुप बी अशा दोन गटांमध्ये स्पर्धा घेतली गेली. 210 विद्यार्थी यामध्ये सहभागी झाले होते. चार विद्यार्थ्यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले,
सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. या स्पर्धेसाठी मुख्याध्यापक सुरेश अष्टगी व सर्व शिक्षकांचे सहकार्य लाभले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लोकमान्यच्या महांतेशनगर शाखेच्या व्यवस्थापक तेजश्री होसकल्ली, असिस्टंट मॅनेजर परेश शिरोडकर, सचिन राऊळ, तन्वी भारती, शंकर किणीकर, आयसीआयसीआय इन्शुरन्स कंपनीच्या प्रतिनिधी निकिता मुचंडी, वैभव उज्जीनकोप्प आदींनी परिश्रम घेतले.