Tarun Bharat

‘त्या’ साखर कारखान्याच्या दूषित पाण्यामुळे समस्या

कोकटनूर ग्रामस्थांचे जिल्हाधिकाऱयांना निवेदन

प्रतिनिधी /बेळगाव

अथणी तालुक्मयातील कोकटनूर येथे रेणुका शुगर्स साखर कारखाना आहे. त्या साखर कारखान्याचे मळीमिश्रीत पाणी उघडय़ावरच सोडण्यात येत आहे. त्यामुळे या परिसरातील विहिरी, कूपनलिकांचे पाणीदेखील दूषित झाले आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनत असून संबंधित साखर कारखान्यावर कारवाई करून आम्हाला न्याय द्यावा, अशी मागणी कोकटनूर परिसरातील नागरिकांनी जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

साखर कारखान्याचे रासायनिक पाणी आहे ते योग्य प्रकारे निचरा केले पाहिजे. मात्र ते पाणी उघडय़ावरच सोडण्यात येत आहे. विहिरींचे पाणी दूषित झाल्यामुळे ते पाणी पिणे अवघड झाले आहे. तेंव्हा तातडीने योग्य ती कारवाई केली पाहिजे, असे निवेदनात म्हटले आहे. याबाबत रेणुका शुगर्स कारखान्याच्या व्यवस्थापकांना अनेकवेळा माहिती दिली आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. महत्त्वाचे म्हणजे शिवारात पाणी सोडल्यामुळे जमीनही खराब झाली आहे. पीक घेणे अवघड झाले असून याबाबत आता प्रदूषण विभागाने लक्ष द्यावे, आाr मागणी करण्यात आली. यावेळी सिद्धाप्पा अडळट्टी, दानप्पा अडळट्टी, हणमंत अडळट्टी, बसनिंग अडळट्टी, लक्ष्मण अडळट्टी, बसू खोत, मालव्वा मादर, संगाप्पा खोत, जयश्री अडळट्टी यांच्यासह इतर महिला व नागरिक उपस्थित होते. 

Related Stories

कोटपा कायद्याच्या अंमलबजावणीसाठी पोलिसांना प्रशिक्षण

Omkar B

आरोग्य सेतू अ‍ॅपवर उच्च न्यायालयाने बीएमआरसीएलकडून मागितले स्पष्टीकरण

Archana Banage

बरगांव येथे के. पी. पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कुस्ती मैदान

Amit Kulkarni

बेळगावात येणाऱ्यांना आता 7 दिवसच संस्थात्मक क्वारंटाईन

datta jadhav

बुधवारी जिह्यात कोरोनाचा उद्रेक, उच्चांकी 757 रुग्णांची नोंद

Patil_p

केएससीए ए डीव्हिजन स्पर्धा आजपासून

Amit Kulkarni