Tarun Bharat

नवी गल्लीतील ड्रेनेज चेंबर तुंबल्याने समस्या

प्रतिनिधी /बेळगाव

शहर व उपनगरातील डेनेज वाहिन्या घालण्यासाठी लाखो ऊपयांची उधळपट्टी केली जाते. तरीदेखील डेनेज तुंबण्याचे प्रकार सुरूच आहेत. नवी गल्लीतील डेनेज चेंबर तुंबल्याने सांडपाण्याची समस्या निर्माण होत आहे. याबाबत मनपा प्रशासनाकडे तक्रार करूनही याची दखल घेण्यात आली नसल्याने परिसरातील रहिवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

डेनेज चेंबरच्या देखभालीकरिता महापालिका प्रशासनाने विशेष कंत्राटदाराची नियुक्ती केली आहे. डेनेज वाहिन्यांच्या दुऊस्तीकरिता तसेच डेनेज वाहिन्या घालण्यासाठी लाखो ऊपयांचा निधी खर्ची घातला जातो. पण समस्या जैसे थे आहेत. शहराच्या विविध भागातील डेनेज चेंबर नेहमीच ओव्हरफ्लो होत असतात. स्मार्टसिटी निर्माण करण्यासाठी कोटीचा निधी खर्च करण्यात आला आहे. पण स्थानिक नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांचे निवारण करण्यात अपयश आले आहे. त्यामुळे शहापूर नवी गल्लीतील ड्रेनेज वाहिन्या तुंबल्या आहेत. परिणामी सांडपाण्याचा निचरा व्यवस्थित होत नसल्याने नागरिकांना समस्या निर्माण होत आहे. याबाबत मनपा अधिकाऱ्यांकडे तक्रार करूनदेखील तुंबलेली डेनेज वाहिनी दुऊस्ती करण्याची तसदी घेतली नाही. यामुळे परिसरात घाणीचे साम्राज्य निर्माण होऊन दुर्गंधी पसरली आहे. परिसरातील रहिवाशांना याचा त्रास होत आहे. त्यामुळे आरोग्याच्या समस्येने त्रस्त असलेल्या नागरिकांचे आरोग्यदेखील धोक्मयात आले आहे. यामुळे डेनेज वाहिनीची दुऊस्ती करण्याची मागणी होत आहे.

Related Stories

अंमलीपदार्थ प्रकरणी एकाला 15 वर्षे तर दोघांना 10 वर्षांचा कारावास

Patil_p

कनक, सेंट झेवियर्स, सेंट पॉल्स, इस्लामिया उपांत्य फेरीत

Amit Kulkarni

शहरात प्रवेश अवजड वाहनांना निमंत्रण अपघाताला

mithun mane

नदीकाठावरील देवदेवतांच्या प्रतिमांचे संकलन

Patil_p

कर्नाटक: वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांनी कोरोना वॉरियर्सची भगवान शंकराशी केली तुलना

Archana Banage

रहदारी पोलिसांची भाजी विक्रेत्यांवर कारवाई

Patil_p
error: Content is protected !!