Tarun Bharat

कुंकळ्ळीतही मुसळधार पावसामुळे समस्या

Advertisements

घरांत पाणी शिरल्याने लोकांना सुरक्षित जागी हलविले, महामार्गावर पाणी साचल्याने वाहतूक बाधित, राज्यपालांचे वाहन वळवावे लागले

प्रतिनिधी /कुंकळ्ळी

कुंकळ्ळी परिसरातही मुसळधार पावसामुळे पाणी भरून अनेक ठिकाणी समस्या निर्माण झाल्या. कुंकळ्ळी औद्योगिक वसाहत व आकामळ येथून आलेल्या पाण्याच्या लोटामुळे   बुरिंग-वेरोडा येथील तीन किलोमीटर परिसर पाण्याखाली गेला. त्याचप्रमाणे कुंकळ्ळी क्रीडा मैदान ते उस्किणीबांद, काकणामड्डी परिसरापर्यंतचा राष्ट्रीय महामार्ग पाण्याखाली जाऊन त्यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली.

उस्किणीबांध ते क्रीडा मैदानापर्यंतचा रस्ता पाण्याखाली गेल्यामुळे पर्तगाळ-काणकोण येथे निघालेले राज्यपाल यांचे वाहन असोळणाहून भिंवसामार्गे कुंकळ्ळी बाजार असे वळवावे लागले. दुसरीकडे, पांझरखण-वेरोडामार्गे वळविलेली काही वाहने वेरोडा येथे पाणी भरल्याने अडकून पडली. सकाळी 8 वा. भरलेले पाणी 10.30 पर्यंत कायम राहिले. त्यानंतर पाणी ओसरत गेले. या प्रकारामुळे शाळेत आलेली इयत्ता 9 वी, 10 वीची मुले अडकून पडली. तसेच अडकून पडलेल्या अन्य लोकांना माजी नगरसेवक व वेरोडा येथील इतर लोकांनी मदत केली. माजी आमदार क्लाफासियो डायस यांनीही कुंकळ्ळीत धाव घेऊन लोकांना साहाय्य केले. याबद्दल डायस यांचे माजी नगरसेवक शशांक देसाई यांनी कौतुक केले आहे.

मुसळधार पावसामुळे भिंवसा-चिऱयाआर्क येथील काही घरांत पाणी शिरण्याचे प्रकार घडले. तलाठी गोविद नाईक व कुंकळ्ळी पालिकेच्या 8 कामगारांनी भिंवसा येथील दिनेश देसाई, अनुपमा येसो देसाई, वासू च्यारी यांना तसेच स्वप्नेश देसाई यांच्या निवासस्थानी राहणाऱया 8 स्थलांतरित लोकांना सुरक्षित जागी हलविले. तर चिऱयाआर्क, भिंवसा येथील लता मोरजकर व इतर मिळून 7 लोकांना आणि 4 स्थलांतरित मजुरांना सुरक्षित जागी हलविले. नगरसेवक विशाल देसाई व लँड्री मास्कारेन्हस यांनीही याकामी साहाय्य केले. नायणेवाडय़ावरही रेखा देसाई व इतर लोकांच्या घरांच्या पायऱयांपर्यंत पाणी पोहोचले.

Related Stories

काँग्रेस संस्कृतीची घुसखोरी भाजपसाठी धोक्याची घंटा

Amit Kulkarni

वीजमंत्री नीलेश काब्राल यांच्यावर वाढदिनानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव

Patil_p

मडगाव पालिका मुख्याधिकाऱयांच्या वाढदिन पार्टीत कोविड अटींचा फज्जा

Omkar B

खाणी : तांत्रिकदृष्टय़ा अशक्य, भावनिकदृष्टय़ा कठीण

Patil_p

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 14 रोजी गोव्यात

Amit Kulkarni

मंत्री मिलिंद नाईक यांच्यावरील खनीज चोरीचे आरोप खोटे

Patil_p
error: Content is protected !!