नवी दिल्ली / वृत्तसंस्था
युनिफाईड पेमेंट इंटरफेस (युपीआय) सेवा डाऊन असल्याच्या तक्रारी रविवारी देशाच्या विविध भागात नोंदवण्यात आल्या. ग्राहकांना पेमेंट करण्यात किंवा पैसे हस्तांतरित करण्यात अडचणींचा सामना करावा लागला. इंटरनेट व्यवस्था डाऊन असल्यामुळे युपीआय सेवेवर परिणाम झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ग्राहकांनी सोशल मीडियावर विविध पोस्ट करत यासंबंधीची नाराजी व्यक्त केली. तसेच काही युजर्सनी युपीआय बंद झाल्याबद्दल बँकांकडे तक्रार केल्याचे समोर आले आहे. तथापि, यासंदर्भात सरकार आणि पेमेंट सर्व्हिसेसकडून कोणतेही निवेदन जारी करण्यात आले नव्हते. यापूर्वी एप्रिल आणि जानेवारीमध्ये यूपीआय सर्व्हर डाऊन झाले होते. यंदा तिसऱयांदा असा प्रकार घडला आहे. भारतातील किरकोळ व्यवहारांमध्ये सध्या युपीआयचा वाटा 60 टक्क्मयांहून अधिक आहे.