प्रतिनिधी /बेळगाव
कॅम्प येथील सेंट ऍन्थोनी चर्च येथे सेंट ऍन्थोनी फेस्ट मोठय़ा भक्तिभावाने साजरा करण्यात आला. फादर रिचर्ड क्वाड्रोस यांना मंगळूर येथून या कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले होते. यानिमित्त शांतता व प्रेम निर्माण होण्यासाठी सेंट ऍन्थोनी यांच्या मूर्तीसह कॅम्प परिसरात भव्य मिरवणूक काढण्यात
आली.
हायस्ट्रीट, चर्च स्ट्रीटमार्गे ऍन्थोनी चर्च अशी मिरवणूक काढण्यात आली. शेकडोंच्या संख्येने ख्रिश्चनबांधव यामध्ये सहभागी झाले होते. भक्तांमध्ये सेंट ऍन्थोनी यांच्याविषयीची भक्ती असून, त्यामुळे प्रत्येक मंगळवारी ग्रोटोसमोर येऊन ते मेणबत्त्या लावत असतात. सोमवारी सायंकाळी सेन्ट ऍन्थोनी चर्च येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला सिंधुदुर्ग येथील बिशप ऑल्विन बॅरेटो उपस्थित होते.