प्रतिनिधी / बेळगाव : राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. चंद्रकांत वाघमारे यांना सामाजिक कार्याची दखल घेऊन प्रागतिक लेखक संघ व निर्मिती विचारमंच, कोल्हापूर यांच्या वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय सत्यशोधक – 2022 पुरस्कार जाहीर झाला आहे.
राज्यस्तरीय सत्यशोधक पुरस्काराचे वितरण सोमवार दि. 28 नोव्हेंबर, 2022 रोजी सायं. 5:00 वा. राजर्षी शाहू स्मारक भवन, कोल्हापूर येथे ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस, लेखक व समीक्षक प्राचार्य डॉ. राजेखान शानेदिवाण, खासदार धैर्यशील माने, माजी आमदार राजीव आवळे या मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.